
गडचिरोली:-
“मेरा पानी उतरता देख … मेरे किनारे पर घर मत बसा लेना, ‘‘मै समंदर हु लौट कर
फिर वापस आऊंगा !”
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेली हि शायरी त्यावेळी प्रचंड गाजली होती.यानंतर आपल्या राजकीय डावपेचाने देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले.राज्याची खरी ओळख गडचिरोलीच्या माध्यमातून होईल असा विकास करू असे बोलून ते गेले.पण तेव्हापासून ते गडचिरोलीला आलेच नाहीत.जिल्हयात समस्यांचा डोंगरच डोंगर आहे.रानटी हत्तींनी रान माजविलय,शेतक-यांना कृषीविज मिळत नाही.उदयोगाच्या नावाखाली गरीब शेतक-यांच्या जमीनी हडप करण्याचा डाव रचला जात आहे.असे असतांना मुख्यमंत्री तथा पालकमंत्री मात्र याकडे लक्ष देत नाही.”स्टील सिटी” साठी एवढे “ऍक्टिव्ह” असणारे फडणवीस गडचिरोलीकरांसोबत असे का वागताहेत. हाच प्रश्न पडल्याने लोक म्हणायला लागले.”दर्शन देगा,देगा देवा भाऊ” आता हा मुद्दा घेत काॅग्रेसने सहा जून रोजी सेमाना येथे भव्यदिव्य महायज्ञाचे आयोजन केले आहे.
रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोलीत शेतीचे मोठे नुकसान होत आहे.वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करित असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.शेतीला विजपुरवठा करण्यासाठी प्रशासन लाचार ठरत आहे.उदयोग निर्मीतीच्या नावाखाली बळजबरीने शेतक-यांच्या जमीनी कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहेत.रोजगार हमी योजनेतील लाभाथ्र्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिल्या जात नाहीत.विहीरीचेही देयके प्रलंबीत आहेत.
देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेल्या तिन वर्षापासून गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.दस्तूरखुद मुख्यमंत्री आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री असल्याने नागरिकांत विकासाबाबत आशेचा किरण निर्माण झाला.पण आता गडचिरोली जिल्हयाला मोठया समस्या भेडसावत असतांना पालकमंत्री फडणवीस येथे येतच नाही.गडचिरोलीत शेतक-यांच्या व इतर समस्यांना घेत जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या वतीने अनेकदा तिव्र आंदोलन,निदर्शने करण्यात आली.पण गडचिरोलीच्या समस्यांबाबत त्यांना काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.असे काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.
‘‘गेल्या तिन वर्षापासून गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम करतांना देवेंद्र फडणवीस यांनी येथील नागरिकांना न्याय दिला नाही.यामुुळे जनतेत तिव्र नाराजी आहे.आता तरी त्यांनी या जिल्हयाकडे प्रामुख्याने लक्ष दयावे यासाठी आम्ही ‘‘दर्शन देगा, देगा देवा भाउ’’ चा नारा दिला आहे.याच अनुषंगाने सेमाना देवस्थानात आम्ही महायज्ञ करणार आहोत.’’
महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हाध्यक्ष काॅग्रेस कमिटी,गडचिरोली.
आबांची आठवण @
एकदा पालकत्व स्वीकारले कि, ते कसे निभवायचे याचे अतिशय उत्तम उदाहरण महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील उर्फ आबा यांनी दाखवून दिले होते.त्यांनी या जिल्ह्यात केलेली कामे येथील जनतेच्या आठवणीत आहेत. नक्षल्यांच्या गडात बिनधास्त पने बाईकवर फिरणारे आबा कुठे अन आता इकडे येण्यासही उत्सुक नसलेले हे पालकमंत्री कुठे हा सवाल आता गडचिरोली जिल्हावासीय विचारात आहेत


