
चंद्रपूर:-
भारतीय जनता पक्षाच्या 27 मंडळाच्या प्रमुखांची आज घोषणा करण्यात आली.यात अनेकांना डच्चू देण्यात आला.तर अनेक नवीन उत्साही कार्यकर्त्यांना पक्षाच्या तालुकानेतृत्वाची संधी देण्यात आली.राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक हरिभाऊं ढवस यांना पोंभुर्णा तालुक्याची मदार सोपविण्यात आली.1992 पासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत.तर आमदार देवराव भोंगळे यांचे ‘‘खासमखास’’ दिपक सातपुते यांना पुन्हा एकदा गोंडपिपरी तालुकाध्यक्षपदी निवडण्यात आले.दरम्यानच्या काळात काही पक्षीय विरोधकांनी सातपुतेंना बाजुला सारण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली होती.पण पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखविला.
दिपक सातपुते
दिपक सातपुते हे सोनापूर देशपांडे या गावचे आहेत.ते गेल्या विस वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत.तेव्हापासून त्यांनी सातत्याने आपली सत्ता ग्रामपंचायतीवर ठेवली.ग्रामपंचायत सदस्य,उपसरपंच पंचायत समिती सभापती ते भाजपचे तालुकाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना सातपुतेंनी सोनापूर गावातून मतांची आघाडी मिळवून दिली होती.विधानसभा निवडणुकीतही सातपुतेंनी आपला चमत्कार दाखविला.ते भाजपचे तालुकाध्यक्ष असतांना विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला पहिल्यांदाच तालुक्यातून मताधिक्य मिळाले.यामुळे आमदार देवराव भोंगळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.
हरिभाऊ ढवस
हरिभाऊ ढवस हे पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील रहिवाशी आहेत.ते 1992 पासून भाजपसोबत सातत्याने जुळले आहेत.पक्षासोबत एकनिष्ठता हा त्यांचा विशेषगुण राहिला आहे.तब्बल दोन टर्म त्यांनी गावचे सरपंचपद भुषविले.यादरम्यान विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रयोगशिल गावाची निर्मीती केली.पोंभुर्णा कृषी उप्तन्न बाजार समीतीेचे ते उपसभापती राहिले आहेत.सध्या ते भाजपचे तालुका महामंत्री म्हणून कार्यरत होते.पोंभुण्र्याचे तत्कालीन नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार यांच्या दुर्देवी निधनानंतर तालुकाध्यक्षपद रिकामे ठेवण्यात आले होते.पण आता हरिभाउ ढवस यांच्या रूपाने पक्षाला एक चांगल नेतृत्व मिळाल आहे.ढवस हे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक मानले जातात.


