Sunday, October 11, 2026

भरपावसात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाजविली “थाळी”

 

  गडचिरोली:–

गावात उपचाराची साधन नाही.जाण्यास मार्ग नाही म्हणून बिमार मुलाला पाठीवर घेत कित्येक  किलोमीटर पायदळी प्रवास करणा-या एका वडिलांच्या वेदनांनी संपूर्ण देशातील संवेदनशिल मनाला हेलावून टाकले होते.मागील वर्षी घडलेल्या या घटनेनंतर गडचिरोलीसाठी शासन प्रशासनाने भरपूर दावे केले.पण स्थिती मात्र अदयापही जैसे थेच आहे.किंबहुणा दिवसोंदिवस तर भयावह,भितीदायक होत आहे.उपचाराअभावी गेल्या चार दिवसात जिल्हयातील दहा नागरिकांचे नाहक बळी गेले.निष्क्रीय शासन,प्रशासन पुन्हा किती गरीब नागरिकांचे बळी घेणार असा सवाल विचारत आज गडचिरोलीत काॅग्रेसने ताली बजाओ,थाली बजाओ हे कोट देत आंदोलन केले.भरपावसातही आंदोलनकर्त्यांनी आपला आवाज बुलंद करित प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांना सावधानतेचा इशारा दिलाय 

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक पद रिक्त आहेत अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र येथे आरोग्य सेविका  व कर्मचारी उपलब्ध नाही, अजूनही अनेक गावामध्ये औषधी साठा,  गोळ्यांचा पुरवठा झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यामध्ये गढ़चिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा निष्क्रिय कारभार पुढे येते अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गममावा लागते तरी परंतु शासन आणि प्रशासन या कड़े जानीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा काम सात्यत्याने करतात म्हणून यावर तात्काळ उपाय योजना करावे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक उप जिल्हा रुग्णालयामध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे कोरोना काळात अनेक उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट लावण्याकरीता टेंडर काढण्यात आले मात्र काम पूर्ण न झाल्याने अनेक प्लांट  धूळ खात आहेत त्यांची सुद्धा तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, व सर्व उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे  तसेच  रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी या सह इतर मागन्यांना घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात भर पावसात, गो मलेरिया गो – पालकमंत्री दो” –  गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याचा प्रशासनाने केला खो  म्हणत थाली वाजवत आंदोलन केले व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील विविध समस्या विषयी अवगत केले व तातडीने समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.

ऍड. विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, सतीश विधाते, वसंत राऊत,  प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, राजेश ठाकूर,   नितेश राठोड, दत्तात्रेय खरवडे,  वामनराव सावसागडे, नंदुजी वाईलकर,  रमेश चौधरी,  घनश्याम वाढई,  दिलीप घोडाम, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, प्रतिक बारसिंगे,  हेमंत मोहितकर,  चरुदत्त पोहाणे, स्वप्नील बेहरे, सुभाष धाईत, सुधीर बांबोळे, मजीद सय्यद, नीलकंठ पेंदाम, काशिनाथ गावतुरे, सुधीर बांबोळे, अनिल तुमराम, दिलीप चूधरी, दीपक चौधरी, यादव गेडाम, उत्तम ठाकरे, निखिल पुण्यप्रेडिवार, मिलिंद बारसागडे, राजूभाई सामृतवार, विजय पोवनकार, हेमराज प्रधान, अशोक संदीप, संदीप उईके, अंकुश रामटेके, शामराव बाबनवाडे, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, गौरव येणप्रेडीवार, कल्पना नंदेश्वर,सुनीता रायपूरे, कविता उराडे, रिता गोवर्धन, शालिनी पेंदाम यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!