Sunday, October 11, 2026

धानचुका-याचे 27 कोटी रूपये मंजूर झाले हो…! सुधीर मुनगंटीवार यांच्या सासंदीय आयुधांचा परिणाम

चंद्रपूर :-

पद,सत्ता या भोगायच्या नसून त्या लोकसेवेसाठी,समाजातल्या वंचितासाठी असतात. मंत्रीपद येतात जातात. पण आपल्याकडे सांसदीय ‘‘आयुध’’ आहेत.त्याचा पुरेपूर वाफर आपण करणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री तथा जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते.तेव्हापासून ते फ्रन्टफुटवर जोरदार बॅटींग करित आहेत.यात पुन्हा भर पडली आहे.चंद्रपूर जिल्हयातील रब्बी हंगामातील धानचुका-याचे थकबाकी असलेले 27 कोटी,52 लाख रूपये मंजूर झाले आहेत.यामुळे अडचणीच्या काळात आता हजारो शेतकरी बांधवाना बराच दिलासा मिळणार आहे.

आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री श्री. फडणवीस व वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीवर ठाम भूमिका मांडली होती. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री व वित्त विभागाने तात्काळ निर्णय घेतला. परिणामी धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळणार असून खरीप हंगामाचे नियोजन करताना मोठा दिलासा मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ४३ धान खरेदी केंद्रांमार्फत ५१४५ शेतकऱ्यांकडून २,०९,७४४.६२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. मात्र, थकबाकी न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते. आता मंजूर निधीमुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या हाती पोहोचणार असून खरीप हंगामातील गरजेच्या खते, बियाणे व मजुरी यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.
‘शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणे ही केवळ माझी जबाबदारी नसून माझे कर्तव्य आहे. धान चुकाऱ्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, याचा मला आत्मिक समाधान व आनंद आहे,’ अश्या भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

खताबाबतच्या समस्या असल्यास…
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना युरिया खत मिळत नाही. खताची टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतल्या जाणार नाही. शेतकरी बांधवाना युरिया खत उपलब्ध व्हावे याकरिता युरिया खताच्या कंपन्यांशी सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेतली.यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरिता ७००० मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन निश्चित करण्यात आलं.आतापर्यत ४,३३० टन खत प्राप्त झाला आहे.उर्वरित खत लवकरच प्राप्त होणार आहे. खता बाबत कुठलिही समस्या असल्यास शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासोबतच किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार यांच्याशी संपर्क करून त्यांना समस्या सांगाव्यात असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

श्री.बंडू गौरकार
जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा,चंद्रपूर
संपर्क क्रं. ९१४५४०५६६७

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!