
चंद्रपूर:-
नवरात्र महोत्सवाच्या निमीत्ताने सध्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.चंद्रपुर जिल्हयातील गोंडपिपरी येथे भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने आमदार देवराव भोेंगळे यांच्या संकल्पनेतून ‘‘दादाचा दांडिया’’या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पण या कार्यक्रमाच्या स्थळाला घेत आदिवासी टायगर सेनेने विरोध केला आहे.निवासी आश्रमशाळा हा संवेदनशील विषय असून याठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेणे योग्य नाही.चंद्रपूरात यासंदर्भात पत्रपरिषद घेत त्यांनी आपली भुमिका मांडली.सदर कार्यक्रमाला आमचा विरोध नाही.पण आदिवासी आश्रमशाळेच्या आवारात हा कार्यक्रम तब्बल पाच रात्री होणार आहे.यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याचे आदिवासी टायगर सेेनेने म्हणणे आहे.या कार्यक्रमाकरिता शाळेच्या आवाराची परवानगी देणा-या आश्रमशाळा प्रशासनावर कार्यवाही करण्याची मागणी या पत्रपरिषदेतून करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी येथे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे.या शाळेत जवळपास 300 ते 400 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात.सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव मोठया आंनदी वातावरणात साजरा केल्या जात आहे.गोंडपिपरी येथेही आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून 27 सप्टेंबर ते 1 आॅक्टोबर दरम्यान दादाचा दांडिया हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील सुभद्राबाई सांगळा पाटील आदिवासी आश्रम शाळेच्या प्रांगणात हा उत्सवाचा सोहळा होणार आहे.या कार्यक्रमाविषयी गोंडपिपरीतील परिसरासह अनेक गावात उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान आदिवासी टायगर सेनेेने या कार्यक्रमाच्या स्थळाला घेत विरोध केला आहे.सदर आश्रमशाळा हि निवासी असल्याने हा अतिशय संवेदनशिल परिसर मानल्या जातो.येथे सार्वजनिक कार्यक्रम होत असल्याने काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे.सोबतच येत्या दिवसात परिक्षा होणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याचे सेनेचे म्हणणे आहे.सदर कार्यक्रम हा रात्रो होणार आहेत.दरम्यान या संपूर्ण मुद्द्याना घेत आदिवासी टायगर सेेनेने चंद्रपूरात पत्रपरिषद घेतली.यात कार्यक्रमस्थळाला विरोध करण्यासोबतच प्रांगणाची परवानगी देणा-या आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हे दाखल करून निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसे न झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.पत्रपरिषदेला आदिवासी टायगर सेनेचे विदर्भ प्रमुख संतोष कुळमेथे,जिल्हाध्यक्ष ड्रफुल आत्राम,विदर्भ सचिव साईनाथ कोडापे,जिल्हा युवा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे,सुमित्रा आलाम,अभिलाष परचाके,यांची उपस्थिती होती.
“निवासी आश्रमशाळा परिसर हा अतिशय संवेदनशिल असतो.अशावेळी पाच पाच दिवस रात्रीचे कार्यक्रम घेणे हा प्रकार योग्य नाही.यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखिल होणार आहे.नवरात्र उत्सव हा साजरा करणे या बाबीला आमचा विरोध नाही.पण निवासी आश्रमशाळेच्या प्रांगणात हा उत्सव साजरा करणे योग्य नाही.सदर स्थळाला परवानगी देणा-या आश्रमशाळा प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबीत करण्याची मागणी आम्ही प्रकल्प अधिका-यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे”.
साईनाथ कोडापे
विदर्भ सचिव,
आदिवासी टायगर सेना.




