Saturday, October 10, 2026

मारकवार पितापुत्र अजीत पवारांच्या राष्ट्रवादीत…… नागपूरात आज सकाळी सकाळी घेतला पक्षप्रवेश

चंद्रपूर
काॅग्रेसचे जेष्ठ नेते,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,मराठी चित्रपटाचे निर्माते प्रकाश पाटील मारकवार यांनी आपले पुत्र अंजिक्य यांच्यासमवेत आज राष्ट्रवादी काॅग्रेस अजीत पवार गटात प्रवेश घेतला.नागपूर येथे अजीत पवार यांनी पक्षाचा झेंडा टाकत त्यांचे स्वागत केले.

प्रकाश पाटील मारकवार हे जेष्ठ नेते आहेत.त्यांची राजकीय कारर्कीद मोठी राहिली.मुल-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता त्यांनी काॅग्रेसकडून उमेदवारी मागितली होती.पण ती नाकारण्यात आली.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना काॅग्रेसने उमेदवारी दिली होती.या निवडणुकीत प्रकाश पाटील मारकवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करित निवडणूक लढविली होती.

भाजपचे जेष्ट नेते सुधीर मुनगंटीवार हे मुल बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करतात.ते अनेकदा या मतदारसंघातून निवडून येत आहेत.कधीकाळी काॅग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या पस्तीस वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे.अशात अनेकदा प्रयत्न करूनही काॅग्रेस पक्षाला येथून विजय मिळविता आला नाही.

काॅग्रेसमध्ये चांगल्या कार्यकर्त्याना वाव नाही.ठराविक नेते आपल्या मनमर्जीने भुमिका घेतात.हा प्रकार पक्षासाठी चांगला नाही.असे सांगत प्रकाश पाटील मारकवार यांनी आता आपली भुमिका स्पष्ट केली आहे.आज दिनांक 14 डिसेंबर रोजी त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष अजीत पवार यांची नागपूरात भेट घेतली.जवळपास अर्धा तास चर्चा केली.याचवेळी त्यांनी आपले सुपूत्र अंजिक्य मारकवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. अजीत पवार यांनी पक्षाचा झेंडा टाकीत मारकवार पितापुत्रांचे स्वागत केले.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,किसन सेल चे जिल्याध्यक्ष मंगेश पोटवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अजित पवारांनी केले स्वागत
आज सकाळी प्रकाश पाटील मारकवार व अजिंक्य मारकवार यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजीत पवार यांनी त्यांचे स्वागत केले.प्रकाश पाटील मारकवार यांच्यात कमालीची सामाजिक बांधिलकी आहे.त्यांचा प्रशासनातील अनुभव मोठा आहे.त्यांच्यातील जनमताची भावना अनमोल आहे.त्यांच्या पक्षप्रवेशाने आपली संघटनात्मक ताकद भक्कम होईल.असा विश्वास अजीत पवारांनी आपल्या फेसबूक वाॅलवर लिहीलेल्या पोस्टमधून व्यक्त केला.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!