Sunday, June 28, 2026
spot_img

युवा नेतृत्वाची मशाल ………राकेशभाऊ पून

आठवी,नववीत शिक्षण घेणारा विध्यार्थी आपली वेगळी वाट निवडतो.समाजासाठी,जनसामान्यांसाठी आपलं काही देणं आहे याची जाणीव ठेवत आपलं दायित्व जोपासतो.राजकारण हे सामाजिक कार्याचं मोठं माध्यम आहे या समजातून विविध उपक्रम राबवितो. अणे अडत्यांना मदतीचा हात देतो. अनं आपल्या नेतृत्वाची झलक दाखवितो.प्रस्थापित राजकारण्यांना आपल्या कौशल्याने शह देत नगरसेवक होतो. नगरपंचायतीच्या पहिल्याच कार्यकाळात बांधकाम सभापती पदापर्यंत झेप घेतो. आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रभावी नियोजन करून नगराच्या विकासासाठी वीस कोटी रुपयाचा निधी मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. भाजयुमो चे नेतृत्व करतांना युवकांची मोठी संघठनबांधणी करतो. निरंतर सेवेचा ध्यास घेत आपली वाटचाल करतो.युवा नेते, भाजयुमो चे तालुकाध्यक्ष,नगरसेवक राकेशभाऊ पून यांचा हा पंधरा वर्षाचा प्रवास आगळ्यावेगळ्या नेतृत्वाची अनुभूती देऊन जातो. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा ….!

राजकारणात कार्यकर्त्यांच महत्व खूप मोठं असत. राकेश पून यांनी युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. आपल्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडविले.त्त्यांना मदतीचा हात देताना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.राजुरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली देवरावदादा भोंगळे आमदार म्हणून निवडून आले. प्रथमच गोंडपिपरी तालुक्यातून भाजपला मतांची आघाडी मिळाली. गोंडपिपरी शहर हा काँग्रेस चा बालेकिल्ला मानल्या जायचा पन राजकीय इतिहासात या शहरात भाजपला कधीच मतांची आघाडी घेता आली नाही. इतिहासात पहिल्यांदा गोंडपिपरी शहराने भाजपला कौल दिला. अर्थात भाजपच्या समस्त नेते,कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांनाचा तो सकारात्मक परिणाम होता. यात राकेश पून यांच्या नेतृत्वात युवा कार्यकर्त्याचे मोठे योगदान राहिले.

आपल्या कार्याने राकेशभाऊंनी अनेकांची मन जिंकलीत. भाजपचे जेष्ट नेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, राजुरा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात ते विविध उपक्रम राबवित आहेत. कोरोनाच्या कठीन काळात त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता अनेकांसाठी मदतीचा मोठा हात देणारी ठरली.राजकारण हे समाजकारणाचे मोठे माध्यम आहे.हे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
आज राकेशभाऊ पून यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या या कार्याची वाटचाल हि अधिकाधिक वृंध्दीगत व्हावी,त्यांना निरोगी आयुष्य लाभावे,त्यांनी या क्षेत्रात गगनभरारी घ्यावी या कामनांसह

               त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा …….!

 

           लेखिका
    अश्विनी तोडासे
     नगराध्यक्ष ,
  नगरपंचायत,गोंडपिपरी.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!