
आपल आयुष्य हे समाजाच्या कामात याव.निरंतरपणे हे सत्कार्य आपल्या हातून पार पडाव असा दृष्टीकोण बाळगणारी माणस आज दुर्मीळ झालीत.किंबहूणा ती नाहीतच कि काय अशी वास्तविकता आहे.पण अशातही आपल्या आयुष्यात समाजाशी कधीही नाळ तूटू न देता कायमपणे त्यांच्यासाठी काम करत राहणारी माणस आजही आहेत.विद्यार्थीदशेपासून समाजातील विविधांग क्षेत्रात काम करून त्यात आपली वेगळेपणा सिध्द करणारे,वय वर्ष ऐंशी पूर्ण करूनही तितक्याच उत्साहाने समाजासाठी काही करता येईल का याची कल्पकता शोधणारे,गावाच्या,तालुक्याच्या विकासासाठी लाखमोलाची जागा दान देणारे,विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविणारे सुरेशराव चौधरी आज 80 वर्षांचे झालेत. त्यांच्या आयुष्यातील या अष्टदशक पूर्ती प्रवासाकरिता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
समाजकारण,राजकारण, सहकार,अन अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. लहानपणीच आईवडील वारल्याने त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळले.पण अशा स्थितीत त्याच्या मोठ्या बंधूनी अतिशय संघर्षातून परिवाराला सावरले. त्याकाळात ,एम.कॉम चे शिक्षण घेणाऱ्या सुरेशरावांना मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळाली असती. पण त्यांनी वेगळा मार्ग पत्करला.एक मोठे वाहन घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरवात केली.आपले आयुष्य समाजाकरिता खर्च करण्याची भावना मनात ठेवत त्यांनी समाजकारणाला सुरवात केली.याची सुरवात त्यांनी पत्रकारितेतून केली.लोकमत माध्यम समूहात अनेक वर्ष बातमीदारी करीत त्यांनी विविध विषयांना हात घातला.अनेक प्रश्न मांडले. पुढे त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सुरवातीला त्यांनी सहकार क्षेत्रात काम केले.
गावातील लोकांसोबत मिळून त्यांनी सामंजस्याने दूध संघाची स्थापना केली. व लोकांच्या आग्रहास्तव ते त्या संघाचे अध्यक्ष बनले. नंतरच्या काळात गोंडपिपरी सेवा सहकारी संस्था चे अध्यक्ष पद भूषविले, त्यानंतर मात्र त्या सेवा सहकारी संस्थेची कधी निवडणूक झालीच नाही, आज पर्यंत गोडपिंपरी सेवा सहकारी संस्था बिनविरोध निवडून आलेली आहे, ते सलग 15 वर्ष त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.. गोंडपिपरीच्या खरेदी-विक्री संस्थेचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. 1982 ते 1987 पर्यंत ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्याची कामगिरी अतिसहाय्य महत्वाची ठरली.. लगतच्या काळात ते संजय गांधी निराधार योजना गोंडपिपरी चे अध्यक्ष सुद्धा होते.या काळात त्यांनी अनेक निराधारांना मदतीचा हात दिला. 2016 ते सन 2023 पर्यंत ते कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी या समितीचे सलग सहा वर्ष अध्यक्ष म्हणून सुद्धा पद भूषविलेले आहेत.शेतकऱ्यांसाठी त्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून विविध अभिनव संकल्पना राबविल्या अन त्या यशस्वी करून दाखविल्यात.
जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या लक्षात घेता तालुकयातील अनेक सहकार्यांना सोबत घेत त्यांनी संघटना स्थापन केली. त्याचे नेतृत्व ते स्वत अजूनही करीत आहेत.
शेषराव महाराज व्यसनमुक्त संघटनेच्या माध्यमातुन सत्कार्य लक्षात घेता हि मोहीम सर्वदूर पसरावी. यासाठी त्यांनी पुढाकार घेत विहीरगाव येथील मोक्यावरची जागा दान दिली. आज हे ठिकाण हजारो नागरिकांसाठी आशेचं किरण ठरला आहे.
आज त्यांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केलीत. पण त्यांच्यातील उत्साह अजूनही कायम आहे.समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे ते लक्ष ठेवून असतात. सुरेशरावांच्या सेवाव्रतींची हि मशाल अनेकांना प्रेरणेची अनुभूती देऊन जात आहे. त्यांचा हि वाटचाल अशीच प्रभावीपणे सुरु असावी. याच सदिच्छेसह त्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा ……..!


