समाजकारण,राजकारण करतांना बहुतांश लोक केवळ तेवढयापुरतच काम करतात.अलीकडे लहानशे काम करून त्याला समाजमाध्यमातून मोठे स्वरूप देण्याची पॅशन आली आहे.पण आजही समाजात असे व्यक्तीमत्व आहेत.जे समाजासाठी पूर्णवेळ काम करतात.गेल्या पाच दशकाहून अधिक काळ जनसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठविणारे,शेतकरी,कामगार,बेरोजगार व सामान्य नागरिकांसाठी दिवसरात्र एक करणारे पंचायत समितीचे माजी उपसभापती,जेष्ठ नेते तुकेशभाऊ वानोडे यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमीत्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा……!
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे गाव आपल्या विविधांगानी सर्वदूर परिचीत आहे.राज्याचे जेष्ठ नेते विजय वडेटटीवार यांची हि जन्मभुमी.गेल्या पाच दशकाहून अधिक काळापासून गावाच्या नेतृत्वाची धुरा साभांळणारे तुकेशभाऊ वानोडे यांचा राजकीय प्रवास याच भुमितून सूरू झाला.विद्यार्थी दशेपासून समाजकारणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.यातून त्यांचे नेतृत्वगूण फुलले.
समाजकारण ते राजकारणाचा हा प्रवास पाहिजे तेवढा सोपा नव्हता.सामान्यांच्या समस्यांना घेत तुकेशभाउंनी विविध प्रभावी आंदोलन केलीत.करंजी गावासोबत अतिशय दुर्गम असलेल्या गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.गोंडपिपरी पंचायत समितीचे नेतृत्व करतांना त्यांनी उपसभापतीपद भुषविले.

करंजी गावाची किर्ती जगभरात पोहचली.त्याचे खरे शिल्पकार हे तुकेशभाऊच ठरले.तंटामुक्त समितीचे नेतृत्व करतांना त्यांनी शेकडो आंतरजातीय विवाह लाउन नवा इतिहास रचला.याची दखल चक्क आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली.जगातील अनेक देशातील नागरिकांनी करंजी गावात भेट देउन त्याच्या कामाचे विशेष कौतूक केले.आपल्या गावावर अतिव प्रेम करणारे तुकेशभाउंच काम हे सामान्यांसाठी वारंवार आशेचा किरण देतो.त्यांच्यात प्रेरणेची नवी उमेद देणारा ठरतो.मदत करण्याची त्यांची भुमिका थक्क करणारी आहे.
आज तुकेशभाउनी सात दशकाचा आपल्या आयुष्याचा प्रवास पूर्ण केला.पण त्यांच्यातील जिदद,काम करण्याची त्यांची तयारी,प्रंचड उत्साह.व दुस-यांच्या मदतीसाठी धाउून जाण्याची प्रवृत्ती या संपूर्ण बाबी त्यांच्यातील विशेषत्व नमूद करणा-या ठरतात.काही बाबीत मतभेद असले तरी कधीही मनभेद न ठेवणा-या तुकेशभाउंचा आज सत्तरावा वाढदिवस आहे.यानिमीत्ताने त्यांना अनेकानेक शुभेच्छा.त्यांच्या या वाटचालीचा हा उज्वल प्रवास असाच निरंतरपणे सुरू असावा हि सदिच्छा……!
सदर लेख हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा करंजी ग्रामपंचायतीचे सदस्य युवा नेते समीर निमगडे यांनी लिहीला आहे.




