चंद्रपूर:-
मी एका मतदारसंघापूरता मर्यादित नाही.मी राज्याचे नेतृत्व करतो.आता पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील
पाच लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका होउ घातल्या आहेत.या पाचही जागा आम्हीच जिंकू.अनं भाजपचे पानीपत करू
असा विश्वास काॅग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला होता.याच अनुषंगाने
गडचिरोलीच्या काॅग्रेस उमेदवारासाठी ‘‘फुल टाईम’’ काम करणा-या विजय वडेटटीवारांनी चंद्रपुरात मात्र आपली तलवार ‘‘म्यान’’केली कि काय याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.लोकसभा उमेदवारीला घेत वडेटटीवार,धानोरकर यांच्यात कमालीचा संघर्ष बघायला मिळाला होता.प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज भरतांना आपणउपस्थित राहू असे त्यांनी सांगितले होते.मात्र ते अनुपस्थित राहिले.यानंतर ते गडचिरोलीत ज्या पध्दतीने सक्रियपणे काम करताहेत त्याच पाश्र्वभूमीवर आता हि चर्चा चांगलीच रंगायला लागली आहे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली आहे.राज्यातील पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका संपन्न होणार आहेत.याकरिता आता विविध पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे.पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडे यावेळी संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.भाजपाने या मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली.काॅग्रेसकडून प्रतिभा धानोरकर रिंगणात आहेत.काॅग्रेसमध्ये उमेदवारीवरून तब्बल पंधरा दिवस ‘‘दावेदारी’’नाटय बघायला मिळाल होत.धानोरकरांच्या उमेदवारीनंतर याला पुर्णविराम मिळाला होता.प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.निर्णय देणारा हायकमांड आहे.तो जे निर्णय देतील तो सर्वमान्य राहिल.यादृष्टीकोनातून प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा काम करणार अशी ग्वाही दोन्ही दावेदारांनी वेळोवेळी दिली होती.
गडचिरोली जिल्हा काॅग्रेसचे विजय वडेटटीवार यांची कर्मभूमी आहे.यावेळी गडचिरोलीतून काॅग्रेसने डाॅ.नामदेव किरसान या उच्चशिक्षीत,कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे.त्यांच्या उमेदवारीसाठी विजय वडेटटीवार यांनी केलेले विशेष प्रयत्न फळास आले.किरसान यांच्या हातात हात देणा-या विजय वडेटटीवार यांनी त्यांच्या विजयाचा संकल्प बांधला आहे.त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करित आहेत.एकीकडे गडचिरोली जिल्हयात ‘‘फुल टाईम’’ काम करणारे विजय वडेटटीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबाबत का उदासीन आहेत.त्यांनी इकडे का तलवार ”म्यान” केली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.



