चंद्रपूर
हे सरकार गरीबांना मारायला निघाले,महागाई वाढवली,राज्यघटना बदलवून सामान्यांचे अधिकार हिसकवू बघत आहे.त्यांना धडा शिकवा.अशा गोष्टी समोर आणून काॅग्रेसच आपल भल करू शकत.असे मोठमोठे नारे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देण्यात आले.आम्हीच गरीबांचे वाली आहोत असे ठासून सांगितल्या गेले.पण प्रत्यक्षात जेव्हा मतदारसंघातील गरीबांवर संकट येते तेव्हा हि मंडळी मात्र मुग गिळून गप्प असतात.कार्यकर्त्याच्या
लग्नाला यायला वेळात वेळ काढणारे आमदार सुभाष धोटे त्याठिकाणाहून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भंगारपेठ येथे एका अन्यायग्रस्ताकडे मात्र ढुंकूनही बघत नाही.याला काय म्हणावे असा प्रश्न आता विचारल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्याच्या सिमेवर असलेला गोंडपिपरी तालुका हा नेहमीच उपेक्षित राहिलाय.इथे ना कुणी उदयोग आणले ना कुणी रोजगार दिला.अशात आपल्या कुटुंबियांच पोट भरण्यासाठी डोळयात अश्रू अनं हातात झोरा धरून लोंढेच्या लोंढे परप्रांतात रोजगारासाठी पलायन करू लागली आहेत.जे आपल्या भुमीला सोडू शकत नाही ते मात्र रोजीरोटी करून कसबस आपल्या संसाराच रहाटगाडग चालवितात.गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील साईनाथ सुरकर हा ही याच धर्तीतला.घरी असलेल्या शेतीच्या तुकडयावर काही भागत नाही म्हणून रोजीरोटी करणा-या या युवा शेतमजूराचा दोन दिवसापुर्वीच प्रशासकिय व्यवस्थेन बळी घेतला.करोडो रूपये खर्चुन उभी झालेली प्राथमिक केंद्राच्या इमारतीत त्यांच्यावर किमान प्राथमिक उपचारही होउ शकले नाही.काहीही चुक नसतांना मागून एका बाईकने त्याला धडक दिली.अनं होत्याच नव्हत झाल.एका गरीबाचा अशापध्दतीने गेलेला जिव,यानंतर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल संकट हा सर्व प्रकार मुळात अनेकांना वेदना देणारा ठरला.पण येथील प्रशासन मात्र ढिम्मच राहिल.लोक्रपतिनीधीकडून थोडयाफार असलेल्या आशाअपेक्षाही पुरत्या फोल ठरल्या.निवडणुकीच्या काळात विकासाच्या,आपुलकींच्या मोठमोठया वल्गना करणा-या नेत्यांची या घटनेन पुरतीच पोल खोलली.
आमदार साहेब लग्नाला येता…….मग इकडल काय…..?
आमदार सुभाष धोटे हे राजूरा विधानसभा मतदारसंघाच प्रतीनिधीत्व करतात.गेल्या निवडणुकीत गोंडपिपरी तालुक्यातील मतदारांच्याच भरवशावर ते निवडून आले.पण येथील सामान्यांच्या समस्यांकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केलय.साईनाथ सुरकर या शेतमजूराचा येथील व्यवस्थेनी बळी घेतला एक जागृत लोकप्रतिनीधी म्हणून त्यांनी या कुटुंबिंयाची भेट घेउन त्यांच्या व्यथा वेदना,जाणून त्यांना किमान सात्वन देण्याची गरज होती.पण आमदार सुभाष धोटे मात्र लग्नसोहळे फिरण्यात व्यस्त आहेत.काल गोंडपिपरीत एका कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नसोहळयात त्यांनी हजेरी लावली.पण येथून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भंगारपेठ येथे ते जाउ शकले नाही.
मुनगंटीवार आज गोंडपिपरीत आहेत…भंगारपेठला जाणार का…?
लोकसभा निवडणुका पार पडल्या.सुधीर मुनगंटीवार हे स्वत भाजपकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते.पहिल्या टप्प्यात चंद्रपूरच्या निवडणुका पार पडल्या.आता ते निश्चींत झाले आहेत.त्यांनी आपल्या कामाचा धडाकाही सुरू केला आहे.सुधीर मुनगंटीवार आज गोंडपिपरीत कन्यका राईस इंडस्ट्रिज चे उदघाटन करण्यासाठी येणार आहेत.अशावेळी ते गोंडपिपरीवरून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भंगारपेठ येथे जाणार का असा प्रश्न आता विचारल्या जात आहे.एका गरीब शेतमजुराचा प्रशासनाच्या चुकीने मृत्यू झाला.त्यापश्चात त्यांच्या कुटुंबियांवर वेदनेच आभाळ कोसळलय.अशा वेळी मुनगंटीवार तरी त्यांच्या वेदंनावर फुंकर घालणार का.ते गोंडपिपरीत येताहेत..ते भंगारपेठ येथे जाउन एका गरीब विधवेच्या व तिच्या दोन चिमुकल्यांना आधार देणार का असा प्रश्न आता भंगाराम तळोधी परिसरात असलेल्या गावातील नागरिक विचारत आहेत.


