Monday, October 12, 2026

सूरकर कुटुंबाच्या वेदनांवर मुनगंटीवारांकडून फुंकर…….. ! सहाय्यता निधीतून पाच लक्ष रुपयाच्या मदतीचा दिला शब्द

चंद्रपूर :-

”दिला शब्द केला, पूर्ण”अशी राज्याचे वने,सांस्कृतिक,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वेगळी ओळख राहिली आहे. आपल्या विविध प्रत्यक्ष कार्यातून त्यांनी अनेकदा त्याचा प्रत्यय दिला आहे. एका शेतमजुरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर संकटाचा आभाळ कोसळलं.घरचा कमावता गेल्याने आपलं व आपल्या चिमुकल्याच कस होणार या चिंतेनं ग्रस्त असलेल्या एका विधवेच्या वेदनांवर सुधीर मुनगंटीवार यांनी फुंकर घातली.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लक्ष रुपयांचा निधी मिळवून देऊ.अन याचा निधीचा धनादेश तुम्हाला तुमच्या घरी आणून देऊ असा शब्द त्यांनी दिला.एवढेच नव्हे तर तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरून त्या कुटुंबाला तातडीने घरकुल मंजूर करण्याबाबतच्या सूचना दिल्यात.

प्रशासकीय अनास्थेने एका निष्पाप शेतमजूरचा बळी गेला. अतिशय गरीब कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबियांवर आभाळ कोसळले. साईनाथ ला अथर्व व अनमोल अशी दोन लहानशी मुल आहेत. या आपल्या मुलांचं कस होणार या चिंतेने पत्नी वैशाली आसवांच्या गर्गेत बुडाली.एका गरीब कुटुंबावर आलेलं संकट, त्यांची झालेली वाताहात समोर आली.

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गोंडपिपरी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी सुरकर कुटुंबियांची भेट घेतली. मृतक साईनाथ सुरकर यांची पत्नी वैशाली, अथर्व व अनमोल या दोन मुलांची आपुलकीने चौकशी केली.अतिशय बेताची अवस्था असलेल्या या कुटूंबाला मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरुही केला. मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लक्ष रुपये, देण्याचा शब्द त्यांनी दिला. यांचसोबत लगेच तहसीलदार शुभम बहाकार यांच्याशी संवाद साधून तातडीने सुरकर कुटुंबाला घरकुलाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिली.दरम्यान सूरकर कुटुंबांच्या घरी भेट देण्याची विनंती काही कार्यकर्त्यांनी केली असता मी मदतीचा धनादेश घेऊनच तिकडे नक्कीच येईन असा शब्द सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.यावेळी माजी आमदार संजय धोटे, भाजप नेते अमर बोडलावार,तालुकाध्यक्ष बबन निकोडे, बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे,नगरपंचायतीचे गटनेते चेतनसिंह गौर,माजी जि.प. सदस्य वैष्णवी बोडलावार,पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सातपुते,नगरसेवक मनीषा दुर्योधन यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!