चंद्रपूर:-
शासन,प्रशासन संवेदन असल कि त्याचे सकारात्मक प्रतीबींब समाजव्यवस्थेवर उमटतात.पण हल्ली ना संवेदनशिलता उरली आहे.नाही आपुलकी अशा स्थितीत चंद्रपूरच्या प्रकल्प कार्यालयाने केलेल्या एका कामामूळे त्यांचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.अचानक लागलेल्या आगीत एका गरीब,आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले.याची माहिती कळताच आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी विकास राचेलवार यांनी औदार्य जोपासले.कार्यालयातील निरी़क्षकाला तातडीने घटनेचा आढावा घेण्याचे आदेश दिले.यानंतर प्रकल्प कार्यालयातील संबधीत कर्मचा-यांनी एकाच दिवसात 51 हजार 500 रूपयाची मदतनिधी गोळा केली.तसेच शासकिय योजनेतून तात्काळ 50 हजार रूपये मंजूर करण्यात आले.जवळपास 1 लक्ष रूपयाची रोख मदत त्यांनी स्वतं शेतक-यांच्या घरी भेट देउन सुपूर्द केली.
कोरपना तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायत अंतर्गत निजामगोंदी येथील शेतकरी कर्णू वाघू मडावी यांच्या शेतातील गोठयाला अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत 20 बक-या व दोन वासरांसह 30 कोंबडयांचा तडफडून मृत्यु झाला. ही घटना रविवारी दि. 9 जून 2024 ला रात्री 8.30 वाजता च्या सुमारास घडली. या आगीत दोन क्विंटल गहू, तांदूळ, 25 पीव्हीसी पाईप, दहा बॅग खते व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले
निजामगोंदी येथील शेतकरी कर्णू वाघू मडावी यांनी शेतात गोठा बांधला. गोठयात त्यांनी 20 बक-या , दोन वासरे बांधून ठेवले होते. शिवाय बेंडव्यात 30 कोंबडया ठेवल्या होत्या. हा गोठा गावापासून अर्धा किमी अंतरावर असून गहू, तांदूळ व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी तिथे ठेवले होते. शेतकरी मडावी हे रोज गोठयातच जागली करायचे. मात्र रविवारी काही कामानिमित्त ते बाहेरगावी गेले. त्यामुळे गोठयात राखणीसाठी कुणीच नव्हते. दरम्यान रात्री अचानक 8.30 वाजातच्या सुमारास अचानक गोठयाला आग लागली. त्यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले व बक-या, वासरे, कोंबळया जळून मृत्यु पावल्याचे दिसून आले.
सदर घटनेची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कार्यालयातील निरीक्षक यांना घटनास्थाळी भेट देण्याचे आदेश दिले. त्या नुसार निरीक्षक यांनी शेतकरी कर्णू वाघू मडावी यांची भेट घेवून त्याठिकाणी घडलेल्या घटनेचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी यांनी कार्यालय अंतर्गत येणा-या कार्यालयीन, वसतिगृह, शासकीय आश्रम शाळा व सर्व कार्यालयीन कर्मचा-यांना सदर शेतक-याला आर्थिक मदत करण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने कर्मचा-यांनी एका दिवसात एकुण 51,500 रुपयाचा मदत निधी गोळा केला.
तसेच अनुसुचित जमातीच्या लोकांना आपात्कालीन / नैसर्गिक/ अमानवीय परिस्थितीमध्ये अर्थसहाय्य देणे/ तदर्थ समितीच्या शिफारशीनुसार 50 हजार पर्यंतची मदत या योजनेअंतर्गत एकुण 50 हजार तात्काळ मंजूर करून घेतले. अशा प्रकारे एकूण रूपये 1 लक्ष 1हजार 500 रुपयांची आर्थिक मदत सदर शेतक-याला 14 जून रोजी प्रत्यक्ष घरी जावून देण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले, गिरीश पोळ, लेखाधिकारी संजय जगताप,आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर उपस्थित होते.


