चंद्रपूर:-
काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रतीभा धानोरकर यांना खंबीरपणे साथ दिली.लोकसभेचे तिकीट मिळविण्यापासून तर त्यांच्या विजयातही धोटेंचा बराच वाटा राहिला.आता खासदार झाल्यानंतर धानोरकरांनी आमदार धोटे संदर्भात कृतज्ञता व्यक्त केली आहे.सुभाष धोटे यांनी बापाची जबाबदारी यशश्वीपणे पार पाडली.आता वेळ मुलीची आली आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी सहा जागा तर जिंकूच.पण याचसोबत यावेळी गडचिरोली मतदारसंघातील नव्हे तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुभाष धोटे यांनाच मंत्री बनवू असा शब्द देत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्यावर निशाना साधला.
लोकसभा निवडणुका पार पडल्या.संपुर्ण राज्याचे लक्ष असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी आश्चर्यकारक निकाल बघायला मिळाले.काॅग्रेसच्या प्रतीभा धानोरकर यांनी भाजपचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2 लाख् 60 हजार 406़ मतांनी दणदणीत पराभव केला.निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजपकडून पराभवाची कारणमिमांसा सुरू आहे.तर दुसरीकडे कमालीचा उत्साह वाढल्याने काॅग्रेसकडून विजयी खासदारांच्या अभिनंदनाचे,सत्कारांचे कार्यक्रम सुरू आहेत.लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रतीभा धानोरकरांनी आघाडी घेतली.राजूरा विधानसभा मतदारसंघातून तर त्यांना सर्वाधिक मतांची आघाडी मिळाली.दरम्यान राजूरा येथे नुकताच खासदार धानोरकरांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी त्यांनी विविध पैलूवर भाष्य केले.
वडेट्टीवारांना आव्हान……………!
लोकसभेची उमेदवारी मिळविण्यापासून सुरू झालेला धानोरकर,वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष थांबायचे नाव घेत नाहीए.आता विजय मिळविल्यानंतर खासदार प्रतीभा धानोरकर या अधिक ताकतीचे बोल बोलू लागल्या आहेत.यावेळी चंद्रपूरचे मंत्री हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आमदार सुभाष धोटेच असतील असे सांगत त्यांनी प्रत्यक्षपणे विजय वडेटटीवार यांना आव्हान दिले आहे.आपणाला तिकीट मिळू नये यासाठी आमदार सुभाष धोटे यांना ‘‘सुपारी’’ देण्याचा प्रयत्न झाल्याचे धानोरकर म्हणाल्या.



