Sunday, June 28, 2026
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील अश्विनीचे का होताहे कौतुक…..!

चंद्रपूर

हातात पकडलेला भला मोठा साप पण चेहऱ्यावर ना कुठली भीती. अनं ना कसलीही चिंता. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेच हे छायाचित्र चांगलेच वायरल होत आहे. अनेकांनी हा फोटो आपल्या स्टेटस वर ठेवलेलाय.नेमकं घडलंय काय अनं कोण आहेत या महिला याबाबत आता उत्सुकतेने विचारणा केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अगदी काल घडलेला हा प्रकार आहे. अश्विनी दिपक वांढरे या गोंडपिपरी येथील रहिवाशी आहेत. येथील चिंतामणी महाविद्यालय परिसरात त्यांचं घर आहे. पती दिपक वांढरे, पाच वर्षाचा मानस या मुलासोबत त्या तेथे राहतात.काल त्याचे पती दिपक वांढरे हे काही कामानिमित्य बाहेरगावी गेले होते. अश्विनी व मानस हे दोघेच घरी होते. अनं तेवढ्यात एक मोठा साप निघाला. सापाला बघून सुरवातीला अश्विनी घाबरल्या. पण तो धामण प्रजातीचा असल्याचे समजल्यानंतर त्यांची भीती कमी झाली. यांनतर त्यांनी अतिशय शीतफिने या सापाला पकडले. हा प्रकार समजतात जवळपास च्या तरुणांनी गर्दी केली. अनं त्यांच्याच मदतीने या सापाला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.
एका महिलेन भल्या मोठया सापाला पकडलं हा विषय समाजमाध्यमातून वेगाने वायरल झाला अनं मग काय अश्विनीच्या या धाडसाचीच चर्चा सुरु झाली.

विशेष म्हणजे अश्विनीचे यजमान दिपक वांढरे हे जुनेजाणते सर्पमित्र आहेत. अनेकदा अश्विनी समोर पतीने साप पकडले. अश्विनी मात्र कधी या भानगडीत पडली नाही. पण आलेल्या परिस्थितीवर मात करण्याची अश्विनीची राहिलेली वाटचालीचा प्रत्यय अनेकांनी बघितला.अश्विनी वांढरे या सातत्याने पर्यावरण च्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी समाजकार्यात पद व्यूत्तर चे शिक्षण घेतले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!