Sunday, June 28, 2026
spot_img

शेलारांचे स्वागत,डाॅ.उईकेंच्या नावाला ‘‘डच्चू’’ मुनगंटीवारांच्या ‘‘या’’ पोस्टची राजकीय वर्तुळात होतेय चर्चा

चंद्रपूर

मंत्रीपद न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहेत हे आपण अनेकदा ऐकल आहे.यासंदर्भात अनेक बातम्यादेखील प्रसिध्द झाल्या.पण आपण विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी जात असतो,वंचित,दिनदुबळे,गरीब,कष्टकरी व बळीराजांच्या समस्या मांडण्यासाठी आपले आयुध वाफरणार असल्याचे सांगत राज्याचे माजी वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तुफानीने गाजवलय.त्यांच्या अनेक मुदयावर शासनाला निर्णय घेणे भाग पडले.पण त्यांच्या गृहजिल्हयाची कमान आता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डाॅ.अशोक उईके यांच्यावर आहे.अशात मुनगंटीवारांना उईकेेंची एलर्जी आहे का असा प्रश्न आज राजकीय वर्तुळातून उमटत आहे.याचे कारण ठरले आहे.त्यांच्या एका समाजमाध्यमावरील पोस्टची.

राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे आज चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर होते.कोरपणा येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवासाठी ते आज इकडे आले होते.चंद्रपूरात आगमन झाल्यांनतर शासकीय विश्रामगृहात सुधीर मुनगंटीवार यांनी शेलारांच जोरदार स्वागत केल.त्यांना गणरायांची प्रतिकृती आणी पुष्पगुच्छही दिलेत.यावेळी त्यंाच्या सोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डाॅ.अशोक उईके हे देखिल उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार सोशल मिडीयावर खूप एक्टीव्ह आहेत.ते आपल्या प्रत्येक घडामोडी समाजमाध्यमातून शेअर करतात.त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.ते त्यांच्या प्रत्येक मॅसेेजवर प्रतिक्रीयादेखिल देतात.पण आज काही तासापूर्वी मुनगंटीवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला.त्यात काही ओळीदेखील लिहील्या होत्या.चंद्रपूरातील कोरपणा येथील आदिवासी सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्याचे माहिती तं़त्रज्ञान मंत्री ना.आशिष शेलार यांचे चंद्रपूरातील शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्याबाबत त्यांनी गणरायाची प्रतिकृती भेट दिली.सोबतच पुष्पगुच्छ देत त्यांचे जोरात स्वागत देखिल केले.यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री डाॅ.अशोक उईके हे देखिल उपस्थित होते.सुधीर मुनगंटीवार यांनी शेलारांच्या स्वागताचे फोटो शेअर केले.पण त्यांनी पालकमंत्री उईकेंच्या नावाला आपल्या समाजमाध्यमातील मॅसेजमधून डच्चूच दिला.आता याचीच चर्चा चंद्रपूर राजकारणात रंगू लागली आहे.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!