Sunday, June 28, 2026
spot_img

विकलेली जमिन बळकवता,तुम्ही काय दान करणार…. कंकडालवारांनी केली आत्रामांच्या दाव्याची पोलखोल…..!

 

गडचिरोली

सुरजागड येथील लोहखनिजावर प्रक्रिया करण्यासाठी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे प्रकल्प होणार आहे.नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याचा मोठा गाजावाजाही केला गेला.भूमिपूजन कार्यक्रमाच्या आधी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतःच्या मालिकीची 250 एकर जागा दान दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. गरीब, आदिवासी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण आपली जागा दान देत असल्याचे आत्राम यांनी सांगितले होते. पण आता काँग्रेस नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्रामांच्या दाव्याची पुरती पोलखोल केली आहे. जागा विकून ती पुन्हा बळकविणारे कसे काय दान करू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आत्राम ज्या 250 एकर दान केलेल्या जागेबाबत बोलताहेत. ती मुळात अनेकांची आहे. त्यापैकी बहुतांश जमीन ही महसूल विभागाची आहे.मोठमोठ्या झाडांची कत्तल करून नियमांची ऐसीतैसी करण्यात आली आहे. ही जागा दान दिलेली नसून लिजवर देण्यात आली आहे असा आरोप कंकडालवार यांनी “चंद्रगड” शी बोलतांना केला आहे.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने भाजप व मित्रपक्षात कमालीची अस्वस्थता आहे. अशात नियमांची ऐसीतैसी करीत लोकांना दाखविण्यासाठी हा सारा खटाटोप सुरु आहे. पण गडचिरोलीच्या तरुणांनी यांचा सारा डाव ओळखला आहे.विधानसभेच्या निवडणुकीतही ते त्यांना चांगला धडा शिकवितील असेही कंकडालवार म्हणाले.

.मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरजागड प्रकल्पामुळे गडचिरोली च्या तरुणांना मोठा रोजगार मिळेल असे सांगण्यात आले होते. पण तसे झाले नाही याउलट सुरजागड वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले. स्थानिक तरुणांपेक्षा बाहेरील लोकांनाच रोजगार मिळाला.आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप, मित्रपक्षांचा सुफळा साफ झाला. विधानसभा निवडणुकातही त्यांना पराभवाची मोठी भीती आहे.अशात आता अहेरी तालुक्यात सुरजागड इस्पात च्या प्रल्कपाचे भूमिपूजन करण्यात आले.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

दरम्यान आता इस्पात कंपनीला दिल्या गेलेल्या 250 एकर जागेला घेत काँग्रेस नेते अजय कंकडलावर यांनी गंभीर आरोप केले आहेत.250 एकर जागा दिल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले होते. हे साफ खोटे असून स्वतः लोकांना विकलेली जमीन बळकविणारे जमीन दान कसे देऊ शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ही जागा मुळात अनेकांची आहे. यातील बहुतांश जागा ही महसूल, वनविभागाची आहे. या जागेवरील मोठ्या, जुन्या वृक्षांची नियमबाह्य रित्या कत्तल केल्या गेली.हा सारा प्रकार अतिशय गंभीर आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता तरुणांना फसवीण्यासाठी भाजप, मित्रपक्ष व इस्पात कंपनीचा हा डाव असल्याचे कंकडालवार यांनी सांगितले.मागील निवडणुकीतही सुरजागड प्रकल्पाच्या माध्यमातून 40 आदिवासी तरुणांना ट्रॅक देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करण्यात आली. आता देखील ही मंडळी बेरोजगार, आदिवासी तरुणांना गाजर दाखविण्याचा प्रकार करीत आहेत. पण गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाई यांचे मनसुबे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असेही कंकडालवार म्हणाले.

आंदोलन करू

लोहप्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जुन्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. कंपनीकडून प्रशासनाला हाताशी घेत हा प्रकार केल्या गेला आहे.हा प्रकार गंभीर आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

अजय कंकडालवार
माजी जि.प.अध्यक्ष

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!