
आदिवासी,नक्षलग्रस्त अनं दुर्गम असलेल्या गडचिरोलीच्या विकासाकडे कुणाचेच लक्ष नाही.येथील युवा बेरोजगार त्रस्त आहे.शेतक-यांना कृषी पंप मिळविण्यासाठी तारेवरच्या कसरतीसोबत आंदोलन देखिल करावे लागत आहे.गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्यव्यवस्था कशी कोलमडली आहे.याचा साक्षात्कार करणा-या दोन घटना सुन्न करणा-या ठरल्या.गर्भवती महिलेला चक्क जेसीबीच्या बुलेट मध्ये टाकून नेण्यात आले.तर वडिलांच्या उपचारासाठी त्यांना खाटेवर अठरा किलोमीटरचा पायदळी प्रवास करण्यात आला.नेमका हाच मुददा घेत गडचिरोलीचे खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी संसदेत आवाज उठविला.अध्यक्ष महोदय गडचिरोलीच्या विकासाकडे सरकार लक्ष देणार का असा सवाल उपस्थित करीत त्यांनी जिल्हयाच्या विकासासाठी दरवर्षी दहा हजार करोड रूपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्याची मागणी केली.दुसरीकडे चंद्रपूरच्या खासदार प्रतीभा धानोरकर यांनी शेतकरी आत्महत्येचा मुददा मांडला.एकटया यवतमाळ जिल्हयात 1600 हून अधिक बळीराजंानी आपले जिवन संपविल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली.याचसोबत जुन्या पेशंनचा मुददा त्यांनी समोर आणला.हा अर्थसंकल्प केवळ राज्यांचा असल्याची टिका करित सरकारला धारेवर धरले.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला.यात बिहार व आंध्रप्रदेश या राज्यांवर मोठया प्रमाणावर निधीची बरसात करण्यात आली.सध्या संसदेत विरोधकांचा आवाज बुलंद आहे.विरोधक सरकारची चांगलीच कोंडी करीत आहेत.अर्थसंकल्पावर बोलतांना चंद्रपूर अनं गडचिरोलीच्या खासदारांनी महत्वाचे मुददे मांडून सरकारचे लक्ष वेधले.गडचिरोली जिल्हयातील आरोग्य यंत्रणेचे तिनतेरा वाजले आहेत.सामान्य नागरिकांना मुलभूत सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरत आहे.सुरजागड सारखे प्रकल्प आणून केवळ विकासाच्या भूलथापा दिल्या जात आहेत.जिल्हयात शेतकरी,बेरोजगार,कामगारांसह सामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही.आता तर उपचार करण्यासाठी अठरा किलोमीटर चा द-याखो-यातील पायदळ प्रवास करावा लागत आहे.

फडणवीस मात्र कार्यक्रमात व्यस्त
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.पण ते गडचिरोलीकडे अजिबात लक्ष देत नाही.गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हयात पावसाने हाहाकार माजविला आहे.सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असे असतांना देवेंद्र फडणवीस मात्र पक्षाच्या बैठकीत व्यस्त आहेत.त्यांनी गडचिरोलीच्या जनतेला वा-यावर सोडल्याचा घणाघात जिल्हा काॅग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.


