Sunday, October 11, 2026

जिल्हा ग्रंथालय होणार अधिक सुसज्ज,मुनगंटीवारांचा पुढाकार.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना होणार मोठा लाभ

चंद्रपूर

अलीकडे तरूणाईत स्पर्धा परिक्षेबाबत कमालीची उत्सुकता आहे.प्रचंड मेहनत घेत ते बडे अधिकारी होण्यासाठी रांत्रदिवस एक करित आहेत.ग्रामीण भागातील अनेक तरूण चंद्रपूरात अभ्यासासाठी जातात.आता अशा तरुणांसाठी राज्याचे वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी मोठा दिलासा दिला आहे.चंद्रपूर येथील जिल्हा ग्रंथालयाच्या विकासाकरिता त्यांनी 14 कोटी 90 लक्ष रूपयाचा निधी मंजूर केला आहे.त्यामूळे लवकरच जिल्हा ग्रंथालयाचा कायापालट होणार असून याचा मोठा फायदा स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या तरूणांना होणार आहे.

चंद्रपूर शहरातील प्रस्तावित जिल्हा ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणाच्या कामाला ‘कौशल्य विकास’ या घटकांतर्गत 14 कोटी 90 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून निधी वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
नियामक परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा, यांच्या अध्यक्षतेत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या 21 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या नियामक परिषदेमध्ये या कामाला प्रशासकीय मान्यता तसेच मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, चंद्रपूर कार्यालयामार्फत शहरातील प्रस्तावित जिल्हा ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून प्रशासकीय मान्यता देण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

  सतत आग्रही
सुधीर मुनगंटीवार १९९५ मध्ये पाहिलांदा आमदार झाले तेव्हा वाचनालय सुरु करण्याची घोषणा केली. घोषणा करून थांबतील ते मुनगंटीवार कसले. त्यांनी हे काम आणखी उत्साहाने पुढे नेले. त्यानंतर चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली. त्या वाचनालयामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत राज्यभर काम करत आहेत. वाचन संस्कृती प्रगल्भ आणि आधुनिक व्हावी यासाठी ना. मुनगंटीवार कायम आग्रही असतात, हे विशेष.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!