Saturday, October 10, 2026

  सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयात जेष्ठ सेनानींनी का केला टाळ्यांचा  गजर 

 

चंद्रपूर: –

वय झाले,हातपाय थकले,पण त्यांच्यातील उमेदीचा किरण मात्र तसुभरही कमी झाला नाही.उतारवयातील आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अनेकांचे दार ठोठावली,निवेदनाचा वर्षाव केला.पण त्यांच्या वेदनांशी सर्वांनीच  दोन हात दुर केले.अशावेळी राज्याचे माजी वने,सांस्कृतिक,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना शब्द दिला.अखेर त्यांनी दिलेला शब्द नेहमीप्रमाणे खरा करून दाखविला.जेष्ठ सेनांनीना विस हजार रूपये सन्मान निधी देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला अनं राज्यातील तब्बल चार हजाराहून अधिक सेनानींच्या चेह-यावर आनंदाची झलक बघायला मिळाली.अशा अनेक जेष्ठ सेनानींनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.सोबत टाळयांच्या गजरात आंनद व्यक्त केला.

आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो, पण आमची कुणी दखलही घेतं नव्हते… त्यामुळे आमचा लढा विस्मृतीत गेला होता… पण सुधीरभाऊंनी आमचं ऐकलं, आमची वेदना समजून घेतली आणि तो आवाज विधानसभेत बुलंद केला. मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस सोबत भेटत निवेदन दिले. आज आमच्या संघर्षाला सरकारदरबारी मान्यता मिळाली, यामुळे एक अपूर्णतेची भावना पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटते,” अशा अत्यंत भावनिक शब्दांत लोकतंत्र सेनानींनी माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी केवळ माझं कर्तव्य निभावलं. तुमचा लढा देशासाठी होता, त्यामुळे राज्य सरकारने तुमचा मान राखावा, हे माझं वैचारिक उत्तरदायित्व होतं. उर्वरित मागण्यांसाठीही मी तुमच्यासोबतच उभा राहीन.’ या घोषणेनंतर उपस्थित सेनानींनी टाळ्यांच्या गजरात सुधीरभाऊ धन्यवाद म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!