Sunday, June 28, 2026
spot_img

राज्यपाल बघणार आदिवासी बांधवांच्या लोकसंस्कृतीचा अविष्कार:          मुनगंटीवारांनी दिले होते निमंत्रण

 

चंद्रपूर

महाराष्ट्र राज्यात आदिवासी बांधवांच्या संस्कृतीला मोठा इतिहास आहे.यातच चंद्रपूर अनं गडचिरोली जिल्हयात आदिवासींची संख्या मोठी आहे.आदिवासींच्या समृध्द परंपरा अनेकांना भूरळ घालणारी ठरली आहे.चंद्रपूरातील ताडोबानंतर आता पोंभुर्णा व लगतच्या जंगलव्याप्त परिसराबाबत अनेकांना आकर्षण आहे.राज्याचे वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची मुंबईत भेट घेतली होती.यावेळी त्यांना चंद्रपूर भेटीचे निमंत्रण दिले होते.याभागात असलेल्या आदिवासी बांधवाच्या संस्कृतीचा अविष्कार बघण्यासाठी मी नक्कीच येईल असे राज्यपालांनी सांगितले होते.आता ते चंद्रपूरला येणार आहेत.येत्या 1 आॅक्टोंबर रोजी राज्यपाल पोंभूर्णा येथे आदिवासी मेळाव्याला उपस्थित असणार आहेत.

दिवाळीच्या पूर्वी राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करताना पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी पारंपारिक उत्सवात उपस्थित राहण्याची ग्वाही राज्यपाल महोदयांनी ना. श्री. मुनगंटीवार व पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांना दिली होती. आदिवासी समाजाचे अधिकार आणि त्यांची लोक संस्कृती जोपासण्यासाठी सर्व प्रयत्न होतील, असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी म्हटले होते. त्याचवेळी ना. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील आदिवासी समाजाच्या मेळाव्याला येण्याचे निमंत्रणही राज्यपाल महोदयांना दिले होते. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले होते आणि आता १ ऑक्टोबरला या महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत.

१ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता पोंभुर्णा येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आदिवासी समाजाचा मेळावा होणार आहे. यावेळी महामहीम राज्यपाल महोदय व ना. श्री. मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील आदिवासी बांधव या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याठिकाणी आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा होणार असून समृद्ध अशा आदिवासी लोकसंस्कृतीचे सादरीकरण देखील बघायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!