
चंद्रपूर:-
माझ्या कुटुंबात जवळपास सर्वच डाॅक्टर आहेत.वडिल डाॅक्टर होते.त्यांची इच्छा होती कि,आपल्या “या” मुलानेही डाॅक्टर व्हावे.ते शक्य झालही असतं पण आणीबाणीच्या काळात वडिलंाना तुरूंगवास भोगावा लागला.अनं आपल्या शिक्षणाची दिशा बदलली.वडिलांची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही.पण गोंडवाना विद्यापीठाने आज कमालीचा योगायोग साधला.पितृमोक्ष अमावश्येचा पर्वावर त्यांनी मला डाॅक्टरकीची उपाधी देत वडिलांची इच्छा पूर्ण केली.हा आपल्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे.आज गोंडवाना विद्यापीठाचा दिक्षांत समांरभ संपन्न झाला.यावेळी राज्याचे राज्यपाल,विद्यापीठाचे कुलपती सि.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सुधीर मुनगंटीवार यांना डाॅक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.यावेळी भावुक झालेल्या मुनगंटीवारांनी आपल्या आठवणींला उजाळा दिला.त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.
राज्याचे राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन चंद्रपूर,गडचिरोली जिल्हयाच्या दौ-यावर आहेत.काल पोंभूण्र्यात आदिवासी मेळाव्यात उपस्थिती दर्शविल्यानंतर आज त्यांनी गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला हजेरी लावली.राज्याचे वने,सांस्कृतिक,मत्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार,विद्यापीठाचे कुलगूरू डाॅ.प्रशांत बोकारे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्यपालाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बोकारे यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.विदेशातील विद्यापीठासोबत गोंडवाना विद्यापीठाचे समन्वय सुरू असल्याचे ते म्हणाले.गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात हे विद्यापीठ शिक्षणाचे मोठेच व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले.यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचे कौतूक केले.आदिवासी भागाला हा विकासासाठी नवा कंेद्रबिंदू ठरला असल्याचे ते म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात अनेक विध्यार्थाचा सन्मान करण्यात आला.माझ्यावर पिएचडी करणा-या विध्यार्थाला पिएचडी मिळाली.अनं आज माझ्या आयुष्यात हा क्षण आला याचा मोठा आनंद आहे.खर तर विद्यापीठ निर्माण करायच असताना त्यासाठी चंद्रपूर कि गडचिरोली हे दोन पर्याय होते.पण आपण गडचिरोलीची निवड केली.राज्यातील अनेक विद्यापीठांना महापूरूषांची नावे देण्यासाठी आपण आग्रह धरला.अनं तो पूर्णही झाला.चंद्रपूरात लवकरच एसएनडीटी विद्यापीठाचे मोठे कंेद्र होत आहे.विद्यापीठ हे भविष्यांचा मोठा आशावाद आहे.ज्या दिवशी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात मुंबईचे विद्यार्थी येउन शिक्षण घ्यायला लागतील त्या दिवशी मी स्वतला धन्य मानेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


