
चंद्रपूर
आयटीआय करणा-या विध्यार्थाना अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमात थेट दुस-या वर्गाला प्रवेश मिळतो.त्यामुळे या क्षेत्रात आपले उज्वल भविष्य घडविणारे या बाबीकडे लक्ष ठेउन असतात.पण यावेळी काही अशी स्थिती निर्माण झाली कि,राज्यातील अनेक अभियांत्रिकी अभ्यासक्रम करणा-या विध्यार्थापूढे मोठीच चिंता निर्माण झाली.संपूर्ण वर्षच वाया जाण्याची भिती त्यांनी सतावू लागली.हा विषय समोर येताच आमदार सुभाष धोटे यांनी तातडीने याबाबतीचा पाठपूरावा केला.राज्याचे उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व संचालक यांच्याशी संपर्क केला.त्यांना निर्माण झालेल्या समस्येची जाणीव करून दिली.यानंतर आता आयटीआय उत्तीर्ण करणा-या संपूर्ण राज्यातील हजारो विध्यार्थाना अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
आमदार सुभाष धोटे हे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.ते दुस-यांदा आमदार म्हणून काम करताहेत.ते काॅग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्षही आहेत.त्यांच्याच नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने चमकदार कामगिरी केली.सुधीर मुनगंटीवार यंाच्यासारखे मातब्बर नेते समोर असतांना त्यांच्या मदतीनेच प्रतीभा धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळविला.
अलीकडे कौशल्य विभागाला मोठे महत्व आले आहे.यामुळे अनेक तरूणाई आयटीआय कडे वळलेली आहे.अभियांत्रिकीच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक जण उच्च शिक्षण घेतात.आयटीआय उत्तीर्ण करणा-या विध्यार्थाना अभियांत्रिकीच्या दुस-या वर्गात थेट प्रवेश मिळतो.यावेळी आयटीआयच्या परिक्षा संपन्न झाल्या.
आयटीआय चे महासंचालक यांनी विद्यार्थ्यांचे निकाल १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी १० वाजता जाहीर केला. मात्र तत्पूर्वी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ही पालीटेकनिक प्रवेशाची अंतिम तारीख होती. त्यामुळे राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान ही बाब आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांच्याशी संपर्क साधून सदर विद्यार्थ्यांसाठी पालीटेकनिक प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात यावी अशी मागणी केली.
अखेर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांनी सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन पालीटेकनिक प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवीली. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थी पालीटेकनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेत त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.


