पोहरादेवीच दर्शन घेतलय,माझा विजय निश्चीत आहे.
चंद्रपूर :-
लोकसभा निवडणुकांच बिगूल वाजल आहे.पहिल्या टप्प्यात होत असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात कमालीची रस्सीखेच होत आहे.दोघांकडून एकमेकांवार ‘‘वाॅर’’ केल्या जात आहेत.अशात आज धानोरकरांनी पारंपारिक वेशभूषेत पोहरादेवीच दर्शन घेतल.यावेळी ‘‘हुकुमशाही’’च्या विरोधात ‘‘लोकशाही’’चा विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सुधीर मुनगंटीवार आपल्यावर टिका करीत आहेत.मात्र चर्चेत मीच आहे.देशात बेरोजगार,कष्टकरी,शेतकरी,महिला यावेळी भाजपला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात त्यांनी केला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविण्यासाठी काँग्रेस व भाजपाने कंबर कसली आहे.दोन्ही पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे.चंद्रपूर जिल्हयातील चार व यवतमाळ जिल्हयातील दोन विधानसभा मतदारासंघाचा यात समावेश आहे.अशा वेळी सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर यांनी आता यवतमाळातील वणी व आर्णी या विधानसभा मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळविला आहे.मुनगंटीवार मोदींच्या नावाने मते मागीत आहेत.तर दुसरीकडे विरोधक रोजगार,शेतकरी व महिला सुरक्षेचा मुददा घेत त्यांच्यावर आगपाखड करीत आहेत.
मुनगंटीवारांनी अनेक पक्षातील नेत्यांना आपणाकडे खेचण्याचा सपाटा लावला आहे.आपला विजय झाला तर चंदपूरला देशातील सर्वाेत्कृष्ठ मतदारसंघ बवनू असे आश्वासन ते देत आहेत.मात्र त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात केवळ इमारती बांधल्या.ते रोजगार देण्यात कमालीचे अपयशी ठरले.केवळ इमारतीचे बांधकाम म्हणजे विकास आहे का असा सवाल त्यांना काँग्रेस विचारत आहे. प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली.अनं यानंतर मुनगंटीवार,धानोरकरांतील शाब्दिक वार पराकोटीला पोहचले.आज धानोरकरांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले.बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूषेत त्यांचे आगमन होताच अनेकांनी त्यांचे स्वागत केले.
वडेट्टीवार वरिष्ठ नेते, त्यांचा आशीर्वाद आवश्यक…!
काँग्रेसच्या उमेदवारीला घेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्यात संघर्ष पेटला होता.धानोरकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या लोकसभा मतदारसंघातील चप्पानचप्पा पिंजून काढीत आहेत.अशात काल त्यांनी गडचिरोलीत विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली.यासंदर्भात आज त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.विजय वडेट्टीवार हे आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत.ते आमचे वरिष्ठ नेते आहेत.त्यांचा आशिर्वाद घेणे आपले कर्तव्य आहे.यातूनच त्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



