चंद्रपूर :
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच पेटली आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार बदलला. अहीर यांना थांबवीत सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर मैदानात आहेत. या दोघांमध्ये विजयासाठी कमालीची रस्सीखेच सुरु आहे. मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी दस्तूरखूद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ( दि 8) ला चंद्रपूरात येत आहेत. त्यांच्या सभेसाठी भाजपने मोरवा विमानतळ परिसरात जय्यत तयारी केली आहे.दुसरीकडे मोदींच्या चंद्रपूरातील सभेला घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज एक वक्तव्य केल आहे. मोदींनी याठिकाणी एक नाही पाच सभा घेतल्या तरी विजय मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचाच होणार असं राऊत म्हणाले. चंद्रपुरात आता मोदीच नाही तर कुणीही आले तरी विजय आमचाच होणार.लोकांचा मोदीवरील विश्वास उडाला आहे.मोदीकडे पाहून मत मारण्याचे दिवस आता गेले आहेत.असे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.दिवसोंदिवस चंद्रपूरातील निवडणूक रंगतदार होत आहे. अशात मोदी चंद्रपूरकरांना किती प्रभावीत करतात यासाठी उद्याच्या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत दिग्गज नेते हंसराज अहीर यांचा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता मोदींनी “चारशे पार” चा नारा दिला आहे. या भानगडीत मोदींचे मंत्री बेताल वक्तव्य करू लागली आहेत.संविधान बदलविण्यासाठी आम्हाला हा आकडा गरजेचा असल्याचे वक्तव्य एका भाजपा नेत्याने केले होते. यानंतर देशात एकच चर्चा सुरु झाली.नेत्याला ताकद देण्यासाठी “शिलाजीत” ची “पॉवर” देण्याच्याही गोष्टी करण्यात आल्या.दरम्यान उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात येत आहेत.
दहा वर्षांपूर्वी ते इकडे आले होते.त्यावेळी भाजप उमेदवार हंसराज अहीर यांचा विजय झाला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठी तयारी भाजप करीत आहे. मोरवा विमानतळ परिसरात सोळा एकर जागेवर त्यांची सभा भव्यदिव्य व्हावी. याचे नियोजन सुरु आहे. दरम्यान मोदींच्या चंद्रपूर सभेला घेत शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी चंद्रपूरात एक नव्हे तर पाचदा जरी सभा घेतल्या तरी प्रतिभा धानोरकर यांचाच विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.


