Sunday, June 28, 2026
spot_img

गडकरी काय बोलून गेले, मुनगंटीवार यांना असं शिलाजीत देऊ ,कि एमदम जोरात काम होईल……..!

चंद्रपूर :-
मोदींच्या “चारशे पार” च्या नादात त्यांचे मंत्री आता बेताल वक्तव्य करू लागले आहेत.रोखठोक बोलणारे गडकरीही यातून सुटू शकले नाहीत.राजुरा येथे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आलेल्या गडकरींनी आज जे काही वक्तव्य केल.त्यावरून आता चांगलाच गदारोड माजला आहे.सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.त्यांच्या मागे मोदींची ताकद,माझी ताकद आहे.त्यांचीही ताकद आता जुडणार आहे.सुधीर मुनगंटीवारांना अस “शिलाजीत” देऊ कि,एकदम जोरात “काम” होईल.त्यांच्या या वक्तव्यांचा सार लक्षात येताच त्यांनी आपला सुर बदलवित त्याला विकासाची जोड दिली.आता याच वक्तव्याला घेत संपूर्ण मतदारसंघात एकच एक चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे.चंद्रपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यापासून भाजपाचे टेन्शन वाढले आहे.भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आता विकासाची बात करण्यावर जोर देत आहेत.प्रतिभा धानोकरांकडून मुनगंटीवारांवर “वाॅर पे वाॅर” होत आहेत.अशा स्थितीत विकासाचे राजकारण समोर आणल्या जात आहे.आज सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजूरा येेथे प्रचारसभा घेण्यात आली होती.यावेळी मार्गदर्शन करतांना गडकरींनी विकासाचे विविध दाखले दिलेत.चंद्रपूर व जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय काय केले याचे त्यांनी पाढेच वाचून दाखविले.मुनगंटीवारांसारखा विकासाचा शिलेदार आपणास निवडून दयायचा आहे असे आवाहन गडकरींनी केले.पण या भानगडीत त्यांनी “शिलाजीत” चा वापर केला.मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.त्यांच्या मागे मोदींची ताकद,माझी ताकद आहे.त्यांचीही ताकद आता जुडणार आहे.सुधीर मुनगंटीवारांना अस “शिलाजीत” देऊ कि,एकदम जोरात काम होईल.असे वक्तव्य करताच उपस्थितही काही वेळ चक्रावून गेले.आपल्या बोलण्यात चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी याला विकासाची जोड दिली

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!