Sunday, June 28, 2026
spot_img

चर्चा भाजपप्रवेशाची….! वडेट्टीवार म्हणाले,‘‘श्रिमंत’’छे धर्मराव आत्राम तर ‘‘बुध्दी’’भिकारीच…… !

गडचिरोली :
सध्या पक्षीय बदलाचे मोठे वारे वाहू लागले आहेत.राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश घेतला.त्यांच्यासोबत किंवा त्यानंतर विजय वडेट्टीवार तिकडे जातील.अशी चर्चा रंगली होती.भाजपच्या व शिंदे गटाच्या नेत्यांनी लवकरच एक बडा नेते आमच्याकडे दिसतील अस सांगितल होत.याच पार्श्वभूमीवर राज्याचे कॅबीनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे ‘‘राईट हॅन्ड’’ आहेत.लवकरच ते भाजपात दिसतील.त्यांच्या भाजपप्रवेशा संदर्भात माझ्यासमोरच चर्चा झाली अस विधान करून काॅग्रेसच्या गोटात खळबळ माजवून दिली.आत्रामांच्या विधानानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.आत्राम,शिरसाट यांची नार्को टेस्ट करावी.आत्राम कसले श्रिमंत राजे ते तर विचाराने भिकारी अर्थात ‘‘बुध्दीभिकारी’’ आहेत असे खणखणीत प्रत्यूत्तर त्यांनी दिलय.

लोकसभा निवडणुकीची लढत अतिशय रंगतदार अवस्थेत आली आहे.एकीकडे भाजपने ‘‘चारशेपार’’ चा नारा दिलाय तर दुसरीकडे काॅग्रेस महाराष्ट्रात यावेळी आम्ही व महाविकास आघाडीच जिंकू असे सांगत आहे.विदर्भातील जनतेने काँग्रेसला कौल देण्याचा विचार केला आहे. अस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते.
पक्षीय बदलाच्या मुदयावरून राज्याचे कॅबीनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर भाष्य केल.वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे “राईट हॅन्ड” आहेत.ते आज किंवा उदया 100 टक्के भाजपात जातील.याचा मी स्वत साक्षीदार आहे.माझ्यासमोरच हि संपूर्ण चर्चा झाली होती.अस आत्राम म्हणाले होते.आत्रामांचे हे विधान येताच वडेट्टीवार त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडले.ते म्हणाले आत्रामांनी आधी आपल्या मतदारसंघातून मतांची आघाडी घेउन दाखवावी.त्यांना कुत्रही विचारत नाही.तुम्ही गूलाम झाले आहात.तुम्हाला कुठ जायच आहे तिथे जा, उगाच कुणाला बदनाम करू नका. फालतूची बळबळ बंद करा असा गर्भीत इशारा वडेट्टीवारांनी दिला.धर्मराव आत्राम कसले श्रिमंत राजे, हे तर ”बुध्दीभिकारी” असल्याचा टोला वडेट्टीवारांनी यावेळी लगावला. यावेळी धर्मराव आत्राम व शिरसाट यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!