गडचिरोली:-
गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतीम टप्प्यात पोहचली आहे.काँग्रेसचे नामदेव किरसान व भाजपचे अशोक नेते हे आमनेसामने आहेत.कुठल्याही स्थितीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्ही प्रमुख पक्षाचे नेते जिवाची बाजी लावीत आहेत.डाॅ नामदेव किरसान यांच्या विजयासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जोरदार फिल्डींग लावली आहे.गडचिरोलीचा चप्पानचप्पा तेे पिंजून काढीत आहेत.दुसरीकडे अशोक नेते यांनी विजयाची हॅट्रीक साधावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशिल आहेत.या निवडणुकीत
डाॅ.नामदेव किरसान बाजी मारणार कि नेते पुन्हा विजयी होणार याकडे आता लक्ष लागले आहे.
भाजपचे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात अगदी शेवटच्या टप्प्यात अशोक नेते यांना उमेदवारी दिली.राज्याचे कॅबीनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची लोकसभा निवडणूक लढण्याचीह इच्छा होती.पण ती पुर्ण झाली नाही.दरम्यानच्या काळात धर्मराव आत्राम,अम्रीश आत्राम यांनी प्रचारापासून दुरी साधली होती.पण ते आता सक्रिय झाले आहेत.गडचिरोलीत आता बदल हवा असे मतदार सांगत आहेत.कोनसरी प्रकल्पाचा भूमी अधिग्रहणाच्या मुदयावरून चामोर्शी तालुक्यातील नागरिकांत संताप आहे.मागील दिवसात अनेक गावात भाजपच्या प्रचारार्थ गेेलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना परतवून लावण्याच्या घटना समोर आल्या होत्या.
निवडणूक अंतीम टप्प्यात असतांना आता विजयाचे दावे,प्रतिदावे केल्या जात आहेत.डाॅ.नामदेव किरसान यांच्या विजयासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत ठाण मांडून बसले आहेत.अशोक नेते यांना त्यांनी मौनी बाबांची उपमा दिली आहे.भाजपने जो सर्वे केला होता.त्यात नेते हे दोन लाख मतांनी पराभूत होतील असा दावा वडेट्टीवारांनी केला होता.गडचिरोली चिमूर मतदारसंघात होत असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार आता याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



