चंद्रपूर :-
देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पहिल्याच टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली.यावेळी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार मैदानात होते.प्रतीभा धानोरकर यांनी काँग्रेसची उमेदवारी घेत लोकसभेची निवडणूक लढविली.या मतदारसंघात कोण निवडणूक जिंकणार, या मुद्द्याला घेत आता शक्यताचा बाजार भरवीला जात आहे.दरम्यान आज दिवंगत बाळू धानोरकर व प्रतीभा धानोरकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यनिमित्याने धानोरकरांनी समाजमाध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी
मिस यू “बॉस”अशी कॅचलाईन देत. बाळू धानोरकरांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.त्यांच्यासोबतचे विविध फोटोबद्ध असलेल्या जुन्या क्षणाचा अल्बम त्यांनी शेअर करीत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिलीय.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत लोकसभेची तिकीट मिडविण्यापासून मतदान होई पर्यंत प्रतीभा धानोरकर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. राज्यासह देशभरातील राजकीय मात्तबरांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते.चारशेपार चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी सभा घेतली होती. अश्रू, सहानुभूती, भाऊबहीण,शिलाजीत, असे अनेक मुद्दे या निवडणुकीत चांगलेच गाजले.19 एफ्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल 4 जुन रोजी जाहीर होणार आहे.
यादरम्यान आमचाच विजय निश्चित असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केल्या जात आहे.
बाळू धानोरकर हे प्रतिभा धानोरकर यांचे राजकीय गुरु राहिले आहेत. त्यांच्याच नियोजणामुळे प्रतिभा आमदार होऊ शकल्या.खासदार पतीच्या निधनानंतर लोकसभा निवडणुकीला सामोरे जातांना प्रतीभा धानोरकर वेळोवेळी त्यांची उणीव बोलून दाखविली.आज धानोरकर दाम्पत्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. पती आपल्यात नाही. अशावेळी केवळ त्यांच्या आठवणीच आता उरल्या आहेत. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची माहिती देतांना प्रतीभा धानोरकर यांनी मिस यू “बॉस”असे कॅचलाईन देत त्यांच्यासोबतच्या आठवणीना उजाळा दिला आहे.



