चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील प्रसिद्ध व्यावसायिक नरेश तुमडे यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली आहे. नुकताच त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. त्यांना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष पद देण्यात आले.
नरेश तुमडे हे गोंडपिपरी येथे भाजीपाल्याचे ठोक व्यावसायिक आहेत. अतिशय परिश्रम करून त्यांनी आपल्या व्यवसायाला एका उंचीवर पोहचविले. गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायासोबत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या तुमडे यांनी राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे.
गोंडपिपरी येथील काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात राजुरा येथील काँग्रेस नेते अरुण धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुमडेनी पक्षात प्रवेश घेतला. लागलीच त्यांना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पद बहाल करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे,निलेश संगमवार, प्रा.शंभुजी. येलेकर,राजू झाडे, विपीन पेद्दूलवार,सुरेश चिलनकर,अजय माडूरवार, अनिल झाडे, बबलू कुळमेथे,मुरलीधर उरवेते, सम्राट भडके यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीसाठी फिल्डिंग
सात टप्प्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच विधानसभेची लढाई होणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात पार पडली. निकालासाठी ४ जून ची प्रतिक्षा आहे.
मात्र आतापासूनच विधानसभा निवडणुकीकरिता फिल्डिंग सुरु झाली आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात गोंडपिपरी तालुक्याची भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आहे.यामुळं नेत्यांचे दौरे वाढले आहेत. काँग्रेस नेते अरुण धोटे तालुक्यात रोजच चकरा मारीत आहेत.भाजपचे देवराव भोंगळे देखील ऍक्टिव्ह मोडवर आहेत.



