Sunday, October 11, 2026

निवडणुक संपली,गडचिरोलीत काँग्रेस मात्र ऍक्टिव्ह मोडवर ….!

गडचिरोली

राज्यातील लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या.गडचिरोली मतदार मतदारसंघात यावेळी अटीतटीची लढत बघायला मिळाली. काँग्रेसचे नामदेव किरसान व भाजपचे अशोक नेते हे आमनेसामने होते. येत्या 4 जुन ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.यात कौन बाजी मारणार यावरून दाव्यांचा बाजार सुरु आहे.एकीकडे गडचिरोली मतदारसंघाची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपचे अशोक नेते अनॅक्टिव्ह दिसत आहेत. याउलट निकालाची चिंता न करता मतदान संपल्यापासूनच किरसान यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु ठेवला आहे. काँग्रेसचे जिल्याध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली च्या समस्यांना घेत अनेक नेते व कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडवर काम करीत आहेत.

जिल्ह्यात वारंवार रानटी हत्तीचे आगमन आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रानटी हत्तीच्या हल्ल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी सोबतच रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या घराची नुकसान झाली असून त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी, उन्हाळी धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून हमीभावाप्रमाणे सुरु करण्यात यावी यासह गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक भागात हलक्या पावसानेही पाणी जमा होऊन त्याठिकाणी नागरिकांना ये जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागतो अश्या रस्त्यावर रस्ते वाहतूक विभागामार्फत मान्सून पूर्व दुरुस्ती करण्यात यावी अश्या
विविध समस्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. लोकसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर गडचिरोलीच्या विविध समस्या घेत काँग्रेस कार्यकर्ते फुल्ल ऍक्टिव्ह मोडवर काम करीत आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!