Sunday, June 28, 2026
spot_img

सुधीर मुनगंटीवारांचा २,६०,४०६ मतांनी दारुण पराभव,चंद्रपुरात धानोरकरच खासदार

चंद्रपूर:-

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतीभा धानोरकर यांनी तब्बल २,६०,४०६ मतांनी भाजपचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत एकहाती पराभव केला आहे. चंद्रपुरात पून्हा एकदा धानोरकरच खासदार असल्याचे त्यांनी सिध्द करून दाखविले.चंद्रपूरात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान पहिल्याच टप्प्यात 19 एप्रिल रोजी पार पडले होते.भाजप व काॅग्रेसची उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल यापासून झालेली सुरवात आरोप प्रत्यारोपाच्या फै-यापर्यत पोहचली.देव करो कि आपले लोकसभेचे तिकीट कटावे अशी प्रार्थना सुधीर मुनगंटीवारांनी केली होती.तर दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता शिवानी वडेटटीवारांनी दावा करित फिल्डींग लावली होती.दरम्यान भाजपने सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेची उमेदवारी दिली.तर तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत बाजी मारीत प्रतीभा धानोरकरांनी दिल्लीच्या तिकीटासाठी मैदान सजविले.

विकास,अश्रू,सहानूभूती,बारशिंग्यावरील नवरदेव,शिलाजीत,बहिणभाऊ अशा विविध शाब्दिक चकमकींनी हि निवडणूक चांगलीच गाजली होती.सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी दस्तूरखूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरात सभा घेतली होती.याच सभेत मुनगंटीवारांनी आणीबाणीचा दाखला देत भाऊबहिणीसंदर्भात वादग्रस्त विधान केल होत.सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील भाजपचे मोठे नेते आहेत.ते चंद्रपूर लोकसभेच्या आखाडयात असल्याने या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते.जातीपातीच्या पलीकडे विकासाचे राजकारण झाले पाहिजे असा सूर मुनगंटीवारांनी प्रचारादरम्यान केला होता.काॅग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपत घेत त्यांनी जोरदार फिल्डींग लावली होती.शेवटच्या टप्प्यात त्यांनी आमदार किशोर जोरगेवारांचीही साथ घेतली. प्रतीभा धानोरकर यांनी निवडणुकीचे चांगले नियोजन केले होते.अतीशय मुसददी राजकारणी असल्याप्रमाणे त्यांनी कमालीचा संयम दाखविला.सुधीर मुनगंटीवारांसारखा मातब्बर नेता समोर असतानादेखील त्या डगमगल्या नाहीत.तिकीट मिळविण्यापासून मतदानापर्यत त्यांनी परफेक्ट टायमींग व मॅनेजमेंट साधला.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा कुणबीबहूल आहे.त्याचा मोठा फायदा धानोरकरांना मिळाला.आंबेडकरी विचारधारेची मते मोठया प्रमाणावर त्यांच्या पारडयात पडली.चंद्रपूरात न चाललेला वंचित फॅक्टर धानोरकरांच्या विजयाची कडी ठरला.आज पार पडलेल्या मतमोजणीत  भाजपचे मात्तबर नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करीत नवा इतिहास घडविला.प्रतीभा धानोरकर यांना ७,१८,४१० मते मिळाली तर सुधीर मुनगंटीवार यांनी ४,५८,००४ एवढी मते घेतली 

 कणखर प्रतीभाने घडविला इतिहास
प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजयश्री मिळवीत पहिल्यांदा महिला खासदार होण्याचा मान मिळविला आहे. पतीच्या अकाली निधनानंतर स्वतःला खचू न देता विविध संकटावर त्यांनी अतिशय कसोशीने मात केली. पक्षाची तिकीट मिडविण्यासाठीचा संघर्ष बघता अनेकांना त्यांच्याविषयीची सहानुभूती होती. पण केवळ सहानुभूतीच्या आधारे आपण निवडणूक जिंकू शकत नाही. यांची त्यांना जाणीव होती.यामुळे त्यांनी केलेले प्रभावी नियोजन यशस्वी ठरले.सुधीर मुनगंटीवार सारखा बडा नेता समोर असतांनाही त्यांनी अतिशय प्रभावीपणे वॉर केले.समाजाची मोट बांधण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्याची परिणीती आज त्यांना प्रचंड बहुमताने विजयाच्या स्वरूपात मिळाली.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!