गडचिरोली
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काॅग्रेसचे डाॅ.किरसान यांनी अतिशय प्रभावी कामगिरी करित मोठा विजय मिळविला आहे.त्यांनी भाजपच्या अशोक नेते यांचा तब्ब्बल 1 लाख 41 हजार 696 मतांनी पराभव केला.आपला विजय मिळवित त्यांनी नेतेंच्या हॅॅट्रीकचे स्वप्न पुरते भंगविले.किसरान यांचा विजय घोषित होताच काॅग्रेस व महाविकास आघाडी तथा गडचिरोलीच्या सामान्य नागरिकांनी एकच जल्लोष केला.डाॅ नामदेव किरसान यांच्या विजयासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी जिवाचे रान केले होते.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली.यात काॅग्रेसच्या डाॅ.नामदेव किरसान यांनी तब्बल 6 लाख 17 हजार 792 मते घेतली.भाजपच्या अशोक नेते यांना 4 लाख 76 हजार 96 मते मिळाली.किरसान यांनी नेतेंचा तब्बल 1 लाख 41 हजार 696 मतांनी पराभव केला.हा निकाल समोर येताच गडचिरोलीत मोठा जल्लोष करण्यात आला.
नामदेव किसरान हे गेल्या पंधरा वर्षापासून गडचिरोली काॅग्रेसच्या कामात सक्रियपणे काम करीत आहेत.मागील दोन निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती.पण त्यांच्या पदरी निराशाच आली.अशास्थितीत त्यांनी ना पक्ष सोडला.ना पक्षाचे काम थांबविले.गेल्या अनेक वर्षापासून किरसान सातत्याने गडचिरोलीच्या गावागावात,दुर्गम भागात जाऊन आपले काम प्रामाणीकपणे पार पाडीत होते.दोनदा लोकसभेच्या उमेदवारीला हुलकावणी मिळाली.त्यांच्या जागी नामदेव उसंेडी यांना पक्षाने पसंती दिली.उसंेडी दोन्हीदा पराभूत झाले.अशावेळी किरसान यांची एकनिष्ठता,त्यांची काम करण्याची पध्दत,सामान्यात मिसळण्याची भूमीका नेत्यांनाही प्रभावीत करून गेली.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.अनं त्यांच्या हातात हात दिला.मग काय किरसान यांना काॅग्रेसची तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.यानंतर नामदेव उसेंडी डाॅ.कोडवते दाम्पत्य भाजपत गेले.अगदी निवडणुकीच्या काळात हा काॅग्रेसला मोठा धक्का होता.पण डाॅ.नामदेव किरसान,काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केलेली प्रचंड मेहनत कामात आली.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार हे किरसान यांच्यासाठी गडचिरोलीत ठाण मांडून बसले होते.गडचिरोलीत भाजपाविरोधात असलेला सामान्य जनतेतील रोष,भूमीअधिग्रहणाच्या मुदयावरून शेतक-यांचा संताप,रोजगाराचा प्रश्न हे मुददे चांगलेच गाजले.आज गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला.अनं यात डाॅ.नामदेव किरसान यांनी 1 लाख 41 हजार 696 मतांनी अशोक नेते यांचा पराभव करित त्यांच्या विजयाच्या हॅट्रीकचे स्वप्न पुरते भंगविले.
वडेेटटीवारांचे प्रयत्न फळास
नामदेव किरसान यांनाच काॅग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी विजय वडेटटीवार यांनी पुरेपूर प्रयत्न केले.त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर वडेटटीवारांनी याठिकाणी मोठया प्रमाणावर कॅम्पेनींग केले.ते स्वत अनेक दिवस गडचिरोलीत ठाण मांडून बसले होते.यादरम्यान विरोधकांनी वडेटटीवार हे भाजपत जाणार असल्याचे सांगत विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण वडेटटीवारांनी त्यांना मुहतोड जबाब दिला.अनं ते प्रचारात सक्रिय राहिले.
ब्राम्हणवाडेंची साथ …
गडचिरोली जिल्हा काॅग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी डाॅ.नामदेव किरसान यांना मोलाची मदत केली.एक कर्तव्यदक्ष प्रामाणीक कार्यकर्ता विजयी व्हावा यासाठी त्यांनी जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले.त्यांच्यासह जिल्हयातील हजारो कार्यकर्त्यांनी किरसान यांच्या विजयासाठी प्रयत्नंाची पराकाष्ठा केली.


