Sunday, June 28, 2026
spot_img

खासदारासमोर कर्नाटक एम्टा च्या व्यवस्थापकाला तडकवल

चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या वक्तव्याने तोंडघशी पळत आहेत. अशात आज त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांना मारहाण व शिवीगाड करण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे खासदार धानोरकरांचे भाऊ प्रवीण काकडे यांचा या भानगडीत पुढाकार होता. आता ही घटना समोर आल्यानंतर हा सत्तेचा माज की दादागिरी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.दरम्यान पंधरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्थावर कंपनी करीत असलेल्या अन्यायाचा हा परिणाम असल्याचे बोलल्या जात आहे.

जिल्यातील भद्रावती येथे कर्नाटक सरकारची कोळसा खाण आहे. या खाणीमुळे शेतकरी बांधवाच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.यांचसोबत प्रकल्पग्रस्त बांधवाना अजुनही न्याय मिळाला नाही.या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यात कमालीचा संताप होता.कंपनीच्या व्यवस्थापनाला अनेकदा सांगूनही या प्रश्नाचा तोडगा निघत नव्हता. दरम्यान आज खासदार प्रतिभा धानोरकर कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा कारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी खासदारबंधू प्रवीण काकडे व अनेक शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान चर्चा सुरु असतांना संतापलेल्या काकडे यांनी अधिकाऱ्याला शिवीगाड गेली. याचदरम्यान एकाने अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.यामुळं कमालीचा गोंधळ निर्माण झाला.

धानोरकर म्हणाल्या, तर गंभीर परिणाम.

2009 पासून प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. पन कंपनीने त्याचं शोषण करण्याचं काम केल आहे. याच विरोधात आम्ही कामबंद आंदोलन सुरु केल आहे. आम्ही आधी शिवसेनेत होतो. तोच आक्रमकपणा आजही आमच्यात आहे. कंपनीने तातडीने प्रकल्पग्रस्ताना न्याय द्यावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!