चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याकडे राजकीय पक्षांनी लक्ष वेधले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसलाय.अशावेळी विधानसभेच्या निवडणुका भाजपने गंभीरतेने घेतल्या आहेत.चंद्रपूरातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरही याचे मोठे परिणाम होऊ शकतात. या मतदारसंघात भाजप नवीन स्टार्टजी वाफरु शकते असे झाल्यास राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अमर बोडलावर यांना संधी मिळू शकते. आता याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूकींचा बिगुल वाजणार आहे.राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप व महायुतीला मोठा धक्का बसला. त्यांच्या 45 पार दाव्याची पुरती पोल खुलली.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तर सहा पैकी सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर यांनी मताधिक्य मिळाले होते. राजुरा विधानसभा मतदारसंघात तर धानोरकरांना सर्वाधिक मतांची आघाडी होती.माजी आमदार संजय धोटे, निमकर, सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक देवराव भोंगळे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची टीम असतानाही लोकसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मोठी पिछाडी मिडाली होती.
राज्यात भाजप, महायुती बॅकफूटवर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभानिहाय आलेले निकाल धडकी भरविणारे आहेत. अशात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी भाजपला उमेदवारी देतांना बराच विचार करावा लागणार आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघात संजय धोटे यांच्या रूपाने 2014 मध्ये पहिल्यांदा कमळ फुलले. 2019 मध्येही पक्षाने त्यांना संधी दिली. पण या निवडणुकीत त्यांना मोठा पराभव स्वीकारा लागला होता. साधारणत दोन वर्षांपासून सुधीर मुनगंटीवार यांचे खासमखास देवराव भोंगळे राजुरा मतदारसंघात काम करीत आहेत. पण त्यांना काही करामत करता आली नाही. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या परिणामाने दिसून आला. माजी आमदार निमकर अजूनही भाजपात आपली जागा निर्माण करू शकले नाही.
बोडलावारांना मिळू शकते का संधी…?
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आजपर्यंत राजुऱ्याच्याच शिलेदारांना मिळाल आहे.विधानसभेच्या निवडणुकीच्या विजयात गोंडपिपरी तालुक्याची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिली आहे. पन या तालुक्याला नेतृत्वाची संधी मिडाली नाही. ही खंत अजूनही तालुकावासियात आहे.भाजपचे नेते अमर बोडलावर हे गोंडपिपरी तालुक्यातील आहेत. ते युवास्थेपासून सक्रिय राजकारणात आहेत.
जिल्हा परिषदेचे नेतृत्व त्यांनी केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक जिल्हाध्यक्ष असतांना त्यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात अनेकांना जोडले. बोडलावार गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात आहेत. त्यांच्याच नेतृत्वात गोंडपिपरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील निवडणुकीत काँग्रेस चा सुफडा साफ झाला होता.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. अशावेळी विधानसभा निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघातील तीन प्रमुख नेते फेल ठरल्यानंतर पक्षाकडून उमेदवारी देताना जर काही नवीन स्टाटर्जी राबविली गेली तर त्याचा मोठा फायदा अमर बोडलावार यांना विधानसभेच्या उमेदवार म्हणून मिळू शकतो अशी चर्चा राजकीय गोटात आहे.



