Sunday, October 11, 2026

मग राजीनामा देऊन मोकळे व्हा……! ब्राह्मणवाडेंचा फडणवीसांवर घणाघात

गडचिरोली

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वतःजवळ ठेवले. राज्याचा एवढा मोठा नेता आपला जिह्याचा पालकमंत्री झाल्याने सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील ही अपेक्षा होती. मात्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांना गडचिरोलीसाठी विशेष असं काही करता आल नाही. गुप्त दौऱ्याच्या नावावर जनतेला स्वतःपासून दूर ठेवण्यात आले.जिल्ह्यात अनेक मोठ्या समस्या आवासून उभ्या आहेत. पन एक जबाबदार पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुरते अपयशी ठरले आहेत. हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत की भाजपचे असा प्रश्न करीत जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा घणाघात गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आणि प्रशासनाची गुप्त बैठक घेऊन निघून गेले, मात्र या संदर्भात पालकमंत्री जिल्हा दौरा करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक समस्या प्रलंबित आहे. शेतीला नियमित वीज पुरवठा होत नाही, पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा वाजले आहेत, जिल्हा रुग्णालयात अत्यावशक सोयी उपलब्ध नाही त्यामुळे अनेक रुग्णांना नागपूर किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते, पोलीस भरतीच्या युवकांचे प्रश्न आहेत, 2वर्षे झाले भाजप सरकार सत्तेत आले मात्र अद्याप ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यात आलेले नाही, शेतकरी, महिला, युवक यांच्या समस्यांना घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्र्यांना भेटायचे होते व आपले म्हणणे मांडायचे होते. मात्र पालकमंत्री सुरक्षेचा कारन दाखवून दौरा गुप्त ठेवल्याचे सांगतात. पार्टी च्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरीता पालकमंत्र्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहत नाही मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटल्यामुळे पालक मंत्र्यांना आपल्या जिवाला दोखा वाटतं असेल तर खुशाल त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व सक्रिय असा पालकमंत्री जिल्ह्याला द्यावा जेणे करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकारन होऊ शकेल अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!