Sunday, October 11, 2026

हम होंगे,”कामयाब”राजुरा मतदारसंघात चटपांची जोरदार फिल्डिंग

 

चंद्रपूर
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात वामनराव चटप यांनी पहिल्यांदा सुरुंग लावला होता. त्यांनी तब्बल तीनदा या मतदारसंघांचे नेतृत्व केले होते. आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. विधानसभा मतदारसंघातील गावागावात भेटीचा सिलसिला त्यांनी सुरु केला आहे. त्यांचा उत्साह बघता कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत. 2019 मध्ये पार पडलेली राजुरा विधानसभा निवडणुक अतिशय अटीतटीची झाली होती.अखेरपर्यंत मतांची आघाडी घेणाऱ्या चटप यांचा शेवटच्या मत मोजणीच्या फेरीत अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता.हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. पण वामनराव चटप यांनी तेव्हापासूनच पुन्हा नव्या दमाने आपल्या कामाला गती दिली.आता ते आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप व मित्रपक्षाला मोठा दणका बसला. भाजपचे अनेक मंत्री पराभूत झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार यांचा अडीच लाखाहून अधिक मतांनी दणदणीत पराभव केला. सहा विधानसभा त्यांनी आघाडी घेतली. पन राजुरा मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. यामुळं काँग्रेस गोटात आनंदाचे वातावरण आहे. पण लोकसभा व विधानसभा निवडणूकीचे समीकरण हे नेहमीच उलटे पडल्याचा राजुरा मतदारसंघाचा इतिहास राहिला आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात कुणबीबहुल मतांचे प्राबल्य आहे. आंबेडकरी विचारधारा मानणारी सोबतच आदिवासी समाजाची मते याठिकाणी उमेदवाराला विजय मिळवून देतांना निर्णायक भूमिका बजावत असल्याचे अनेक निकालांनी दाखवून दिले आहे.2019 च्या राजूरा मतदारसंघाच्या निवडणुकीत गोदरु पाटील जुमनाके यांनी 40 हजाराहून अधिक मते घेतली होती. यामुळेच ती निवडणूक रंगतदार ठरली होती.अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.

हम होंगे, “कामयाब”……!

वामनराव चटप हे मुरब्बी राजकारणी आहेत. निवडणुका असोत वा नसोत त्यांची सामान्यांसोबतची जोड नेहमीच राहिली आहे. गावागावात त्यांना मानणारा. मोठा वर्ग आहे. चटप हे आपल्या भाषणातून नेहमीच “हम होंगे कामयाब’ चा नारा देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवितात. राजुरा येथे नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी झालेली गर्दी बघून अनेकांना वामनराव चटप यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचा प्रत्यय देऊन गेली.असे असले तरी वामनराव चटप जेव्हा जेव्हा आमदार झाले तेव्हा तेव्हा त्यांनी केवळ आपल्याच जातीचा विचार केल्याचा आरोप विरोधकांकडून होत राहिला आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!