Sunday, June 28, 2026
spot_img

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात “या” नावांची होतेय चर्चा …….!

 

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी सलग तीनदा विजय मिळवीत हॅट्रिक मारली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना आपल्याच होमग्राउंड वर मोठा फटका बसला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात त्यांना तब्बल 48 हजार 200 मतांची पिछाडी होती. खऱ्या अर्थाने मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का असतांना विरोधकांचा उत्साह मात्र शिगेला पोहचला आहे.लोकसभा निवडणुकीत भाजप, मित्रपक्षाला मिळालेला दणका, राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात असलेले वातावरण, आणी बल्लारपूर मतदारसंघाच्या मतदारांनी दिलेला कौल हे सगळे चित्र बघता या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.काहींनी तर गेल्या अनेक महिन्यापासून प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर आपली सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.चंद्रपूरातील बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे.
पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचे मताधिक्य बरेच घटले होते. त्यावेळी काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराने त्यांना टक्कर दिली होती.
आता या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी दोन हात करण्यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राजकीय गोटात सुरु असलेल्या चर्चेनुसार अनेक इच्छुक उमेदवारांची नाव चर्चेत आहेत. डॉ. अभिलाषा गावतुरे, संतोष रावत, प्रकाश पाटील मारकवार, संदीप गिऱ्हे, राजू झोडे अशा अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याची चर्चा आहे.डॉ. अभिलाषा गावतुरे या गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात काम करीत आहेत. आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडले आहेत. अनेक विषय, समस्यांना घेत त्यांनी आंदोलने केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.प्रतिभा धानोरकर यांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
प्रकाश पाटील मारकवार सध्या ऍक्टिव्ह मोडवर आहेत. विधानसभा मतदारसंघातील गावागावात ते जनसंपर्क अभियान राबवित आहेत. राजू झोडे हा या मतदारसंघातील प्रभावी चेहरा म्हूणन मागील काळात समोर आले. मागील निवडणुकीत त्यांनी 40 हजाराच्या आसपास मते घेऊन प्रस्थापितांना दणका दिला होता.संतोष रावत हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. ते याच मतदारसंघातील असल्याने त्यांचा दावा महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे हे या मतदारसंघातून लढण्यासाठी फुल्ल ऍक्टिवमोड वर आहेत. मूल, बल्लारपूर येथे त्यांनी मोठे कार्यालय उघडली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार ते मूल येथे वास्तव्यास आहेत. मतदारसंघातील लहानलहान समस्या घेऊन गिऱ्हे लोकांचे मत जिकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

हा आहे इतिहास….!

बल्लारपूर मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये झाली. याआधी तो सावली विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा.सुधीर मुनगंटीवार यांची राजकीय सुरुवात चंद्रपूरातून झाली. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मग मुनगंटीवारांनी लगतचा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ निवडला. 2009 पासून ते सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत.
2009 च्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांचे सुपुत्र राहुल पुगलीया मैदानात होते. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 86 हजार 196 तर राहुल पुगलिया यांना 61 हजार 460 मते पडली होती.ही निवडणूक रंगतदार झाली होती.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेस ने आपला उमेदवार बदलवीला. घनश्याम मुलचंदानी यांच्यावर विश्वास दाखविला. पन या निवडणुकीत मुनगंटीवार यांनी मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला. मुनगंटीवार यांना 1लाख 3 हजार 718 मते मिळाली. तर मुलचंदानी यांनी60 हजार 118 मते घेतली.

2019 ची निवडणुकीत या मतदारसंघात तिहेरी लढत बघायला मिळाली. काँग्रेस ने पुन्हा आपला उमेदवार बदलला. राजकारणाशी दूरवर संबंध नसलेल्या डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी देण्यात आली. सुधीर मुनगंटीवार, डॉ. झाडे यांच्या लढाईत युवा नेतृत्व राजू झोडे यांनी ही निवडणूक लढविली या निवडणुकीत मात्र सुधीर मुनगंटीवार यांना कमी मताने विजय मिळाला. त्यांना 86 हजार 2,डॉ.झाडे यांना 52 हजार 762 तर राजू झोडे यांनी तब्बल 39 हजार 958 मते घेतली होती.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!