Monday, October 12, 2026

मंत्रीमहोदय धर्मरावबाबा आत्राम झाले ‘‘डाॅक्टर’’

गडचिरोली
अजीत पवार गटाच्या राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते,अन्न औषध प्रशासन मंत्री अनं राजे असलेले धर्मरावबाबा आत्राम गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या अनेक बैठकातून गायब आहेत.त्यांच्या अनुपस्थीतीला घेत विविध शंका उपस्थित केल्या गेल्या.पण आता मंत्रीमहोदय परतले आहेत ते ही थेट डाॅक्टर होउन.होय हे खरे आहे. एम.बी. इंटरनॅशनल युनिवर्सिटी इंदोर यांच्याकडून “सामाजिक व राजकीय सेवा” या विषयातील अभ्यास, प्रदीर्घ अनुभव व त्यांचे सामाजिक व राजकीय कार्यामुळे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले.त्यामुळे आता ते डाॅ.राजे धर्मरावबाबा आत्राम झाले आहेत.

शरद पवार यांच्यासोबत कायम असलेल्या धर्मराव आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गटाशी सलगी केली. जेव्हा जेव्हा ते आमदार झाले तेव्हा तेव्हा त्यांना मंत्रीपद मिळाले आहे.विदयमान सरकारमध्ये ते अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा फटका बसला. अजित पवारांच्या पक्षाला तर एकाच जागेवर समाधान मानावे लागले.महायुतीतील घटकपक्षाकडून अजित पवार गटाचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने विवीध बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण या बैठकीत मंत्री धर्मराव आत्राम हे अनुपस्थित होते.यामुळे विविध शंका कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या. दरम्यान आत्राम यांची तब्बेत ठीक नसल्याने ते बैठकीला उपशीत राहू शकले नसल्याचे सांगण्यात आलें होते.
या सर्व घडामोडीनंतर आता मंत्री धर्मराव आत्राम परतले आहेत.पण ते ही डॉक्टर होऊन.आता त्यांच्या नावासमोर डॉक्टर हि उपाधी लावलवी लागणार आहे. आत्राम यांनी स्वत आपल्या समाजमाध्यमातुन याची माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!