Saturday, October 10, 2026

अजय कंकडालवार यांच्या समर्थकांना आमीष दाखवून फोडण्याचा प्रयत्न अहेरी विधानसभा मतदारसंघात चाललय तरी काय……!

 


गडचिरोली
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशावेळी विविध पक्षांनी आतापासून राजकीय बांधणी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसला होता.गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची जागा त्यांना गमवावी लागली होती.गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठया मतांची आघाडी मिळाली होती.काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात दस्तूरखूद मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या होम ग्रांउडवर महायुतीला मोठा फटका बसला होता.लोकसभा निवडणुका तर संपन्न झाल्या.पण आता विधानसभा निवडणुका होणार आहेत अशा वेळी अजय कंकडालवार यांनी आपल्या कामांचा झंझावत सुरूच ठेवला आहे.यामुळे नैराश्यग्रस्त विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या खंदया समर्थकांना फोडण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला आहे.आता याचीच चर्चा अहेरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

अजय कंकडालवार हे गडचिरोली जिल्यातील काँग्रेसचे नेते आहेत.आपल्या आविस संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाला सुरवात केली.मागील काळात आलापल्ली येथे झालेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात त्यांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतला.लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या तडफदार कामगिरीचा परिचय दिला.राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच परिश्रमाने काॅग्रेसला मोठी आघाडी मिळाली.दुर्गम भागातील गोरगरीबांच्या सेवेसाठी सदैव कुठल्याही मदतीसाठी तप्तर असलेल्या कंकडालवार यांच्या सामाजिक व विकासकामांचा कामाचा विरोदही पक्षांनी मोठाच धसका घेतला आहे.
आता विधानसभा निवडणुका होणार आहेत.अशावेळी अहेरी विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसची भक्कम बाजू लक्षात घेता विरोधकांनी विरोधाचे विविध फंडे अजमायला सुरवात केली आहे.अहेरी विधानसभा मतदारसंघात अजय कंकडालवार यांचे अनेक समर्थक आहेत.आता विरोधकांना त्यांनाच लक्ष्य केले आहे.त्यांना फोडण्यासाठी विविध कारनामे करण्यात येत आहेत.चक्क अनेक आमीषही दाखविली जात आहेत.आता याचीच चर्चा पूर्ण मतदारसंघात सुरू आहे.विरोधी पक्षाने कितीही फंडे वाफरले तरी आपण आपले कार्य थांबविणारे नसल्याचे अजय कंकडालवार यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!