Saturday, October 10, 2026

तिच्या स्वप्नाला मिळाली “उमेदीची जोड” “यांनी” असा दिला मदतीचा हात …….!

चंद्रपूर:-

गरीबांच्या मदतीला धाऊन जाणारा नेता अशी राज्याचे विरोधी पक्षनेते,ब्रम्हपूरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची वेगळी ओळख आहे.नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाने त्यांच्यातील संवेदनशिलतेच्या प्रत्ययाची अनुभूती मिळालीय.आईवडील गमविलेल्या एका अनाथ तरूणीच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांनी मदतीचा हात दिला.अनं या तरूणीचा दिल्ली येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याचा मार्ग मोकळा झाला.
ब्रम्हपूरी शहरातील बोंडेगांव प्रभागात प्रज्ञा राजकुमार मेश्राम हि तरूणी वास्तव्यास आहे.काही वर्षापुर्वी तिच्या आईवडिलांचे निधन झाले.अनं तिच्यावर संकटाच आभाळ कोसळल.अशावेळी आपल्या आत्याच्या मदतीन तिन स्वतंला सावरल.घरची आर्थीक स्थिती अतिशय बेताची.पण तिने प्रचंड मेहनत घेतली.अनं ब्रम्हपूरीतून पदवीपर्यतंचे शिक्षण घेतले.स्पर्धा परिक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते.हेच ध्येय ठेउन तिने पदवीच्या सुरवातीच्या वर्षापासूनच नियमीत अभ्यासासोबत स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली.पदवीचे शिक्षण झाल्यानंतर दिल्ली येथील एका संस्थेत स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी तयारी प्रज्ञाने सुरू केली.पण इथेही परिस्थिती आड आली.आमदार विजय वडेट्टीवार नेहमी गरीबांना मदत करतात,त्यांच्याकडे अडचणी घेउन गेलेला माणूस निराश होउन परतत नाही.हे प्रज्ञाने ऐकल होत.याच आशावादातून तिने विजय वडेट्टीवार यांची ब्रम्हपूरीत भेट घेतली.त्यांना आपली परिस्थीती,स्पर्धा परिक्षेची दिल्ली येथे प्रवेश घेतांना होत असलेल्या अडचणीची माहिती दिली.यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता दिल्ली येथील संस्थेत शुल्क भरण्यासाठी लागणार असलेली सर्व आर्थीक मदत केली.स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना कुठलीही अडचण आली तर मला सांग असा आशावाद हि तिला दिला.
आपल्या स्वप्नांना उमेदीची मोठी जोड मिळाल्याने प्रज्ञाने आंनद व्यक्त करित आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!