
गडचिरोली
स्वत विविध वेशभूषा साकारून आपल्या जोडीला सजविणा-या बालगोपांलासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम चांगलेच रमले.चिमुकल्यांच्या डोक्यावर प्रेमाचा हात देत त्यांनी प्रोत्साहनाची साथ दिली.काळ वेगाने बदलत आहे.सध्या डिजीटल युग आहे.पण अशातही आपल्या पंरपरांची जाणीव नव्या पिढीला होणे गरजेचे आहे.तान्हा पोळा सारखे सण हे त्यासाठी प्रभावी माध्यम आहे.असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडले.अहेरी विधानसभा मतदारसंघातील आलापल्ली येथे ते बोलत होते.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.लोकसभा निवडणुकीत गडचिरोली मतदारसंघात काॅग्रेसने विजय मिळविला होता.विशेष म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघातही काॅग्रेसने मतांची आघाडी घेतली होती.अहेरी हा धर्मरावबाबा आत्राम यांचा गड मानला जातो.पण आता त्यालाच सुरूंग लागला.अशात लोकसभा निवडणुकीनंतर आत्राम फुल्ल फार्मात आहेत.विधानसभा मतदारसंघातील चप्पानचप्पा ते पिंजून काढीत आहेत.
इस्पात प्रकल्पाला आपली जागा दान देउन त्यांनी मतदारासंघातील तरूणांना रोजगाराबाबत आशावाद निर्माण केला.विविध कार्यक्रमाचे आयोजन,कार्यकर्त्यांच्या बैठका,नागरिकांशी संवाद साधीत त्यांनी जनसंपर्काचा सपाटा लावला आहे.अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर घडवित आत्राम यांनी विरोधकांचा चांगलाच गेम केला.लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काॅग्रेस नेते कमालीचे आशावादी आहेत.अशात आता त्यांना मात देत आपला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याच आव्हान आत्राम यांच्यासमोर आहे.यासाठी ते अगदी फुल्ल फार्मात दिसत आहेत.
नुकतेच त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे राज्यातील पहिल्या पोषण इनोव्हेशन कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन करण्यात आले.हा कार्यक्रम आटोपून परत येत असतांना एका गरीब चहाठेल्याच्या दुकानात आपला ताफा थांबवित त्यांनी चहाचा आस्वाद घेतला.व सामान्यांसोबत आपण कसे जुळून आहोत याचाही परिचय दिला.सध्या राज्यातील राजकारणात कमालीचे रंगतदार वातावरण आहे.आत्राम हे अजीत पवार गटात गेल्यानंतर शरद पवार गट त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.अशात महाविकास आघाडीला मात देत आपला गड कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.अनं यासाठी ते पूर्ण ताकदीने मतदारसंघातील गाव न गाव पिंजून काढीत आहेत.


