
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकांत भाजपला राज्यात मोठा पराभव पत्कारावा लागला होता.आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशात कुठल्याही स्थितीत एक एक जागा जिंकता कशा येतील यासाठीचे नियोजन पक्षाकडून सुरू आहे.चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांनी फिल्डींग लावली आहे.येत्या पाच सप्टेंबर रोजी भाजप नेते,राजुरा विधानसभेचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा वाढदिवस आहे.गेल्या अनेक वर्षापासून निमकर मतदारसंघ पिंजून काढीत आहेत.आता या दिनाचे निमीत्त साधून त्यांच्या समर्थकांनी जोरदार फिल्डिंग लावीत शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केले आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघाने वेळोवेळी अनेक नेत्यांना संधी दिली आहे.सुदर्शन निमकर हे माजी आमदार आहेत.भाजपचे ते नेते आहेत.विधानसभेतील गावागावात असलेली कार्यकर्त्यांची फळी हि त्यांच्या जमेची बाजू आहे.सातत्यपूर्ण जनसंपर्क व कार्यकर्त्याच्या मदतीला धाउन जाणाऱ्या आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाल्यास ती अतिशय प्रभावी ठरू शकते असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.यामुळेच आता सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.येत्या पाच सप्टेंबर रोजी राजुरा येथे भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे,राज्याचे वने,सांस्कृतिक,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार,बंजारा समाजाचे कर्मयोगी संत प्रेमासिंग महाराज,राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,आमदार किशोर जोरगेवार,तेलंगणा सिरपूरचे आमदार डाॅ.पालवई हरिषबाबू,माजी डाॅ.उपेंद्र कोठेकर,आमदार संजय धोटे,भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शेतकरी व महिला मेळावा घेण्यात येणार असून महाआरती व रॅली देखिल काढण्यात येणार आहे.माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने होणार असलेल्या या शक्तीप्रदर्शनाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
मागील दोन निवडणुकांचा इतिहास ….
राजुरा मतदारसंघ हा काॅग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.2014 मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती.राज्यातील राजकारणावरही याचा मोठा परिणाम झाला.शेतकरी संघटनेतून भाजपत प्रवेश घेत संजय धोटे यांनी हि निवडणूक लढविली होती.या निवडणुकीत काॅग्रेस,राष्ट्रवादी काॅग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. भाजपचे संजय धोटे निवडून आले.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काॅग्रेसच काही अस्तित्व नसतांनाही सुदर्शन निमकर यांनी या निवडणुकीत 29 हजार 528 मते घेत आपली ताकद दाखवून दिली.संजय धोटे हे आधी शेतकरी संघटनेचे नेते होते.त्यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर शेतकरी संघटनेनी जेष्ठ नेते प्रभाकर दिवे यांना उमेदवारी दिली होती.पण त्यांना केवळ 16 हजार 469 मते मिळाली होती.मतदारसंघात मोठी ताकद असतांना दिवेंना एवढी कमी मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.या निवडणुकीत संघटनेनी संजय धोटे यांना मदत केल्याच्या चर्चा तेव्हा चांगल्याच रंगल्या होत्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा संजय धोटे यांच्यावर विश्वास टाकला.पण ते तिस-या क्रमांकावर राहिले.काॅग्रेसचे सुभाष धोटे यांनी वामनराव चटप यांचा अडीच हजार मतांनी पराभव करित विजयश्री मिळविली.
यावेळी राज्यात सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.अशावेळी एकएक विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून देणारा उमेदवार पक्षाला हवा आहे.भाजपच्या परंपरागत मतदारांसह काॅग्रेसच्या मतांना खिंडार पाडण्याची क्षमता असणा-या नेता चांगली कामगिरी करू शकतो असा सूर उमटत आहे.अशात आता माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे राजुरा विधानसभा मतदारसंघात असलेले अनेक भाजप नेते एक्टीव्ह मोडवर आहेत.2014 च्या निवडणुकीनंतरही निमकर यांनी आपले काम अधिक गतीने सुरू ठेवले.आता त्यांच्या वाढदिवसाचे निमीत्त् साधीत त्यांच्या समर्थकांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघात आता याचीच चर्चा जोरात सुरू आहे.


