Sunday, October 11, 2026

बैठक चंद्रपूरात…..लक्ष दिल्लीचे…..! इच्छुकांच्या बॅनरबाजीतही गटाचेच दर्शन

 

चंद्रपूर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात मोठ यश मिळाल.यामुळ दिल्लीतील पक्षश्रेष्ठीही समाधानी आहेत.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काॅग्रेस मध्ये विशेषत चंद्रपूरातून अंतर्गत वादविवाद सुरू झाले.लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यापासून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आता टोकाला पोहचले.विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्या मतदारसंघात एका सामाजिक कार्यक्रमात खासदार प्रतीभा धानोरकर यांनी आपल्याच समाजाला याठिकाणाहून नेतृत्व मिळाले पाहिजे.मग तो पक्ष कुठलाही असो असे विधान केले होते.त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून नाराजीचा सुर उमटला होता.अंतर्गत वादामुळे पक्षीय नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्ली येथे काॅग्रेसची बैठक घेण्यात आली.या नेत्यांना बोलावून समज देण्यात आली.अशा वागणुकीचा विधानसभा निवडणुकावर परिणाम होउ शकतो.याची जाणीव वरिष्ठांना झाल्याने आज चंद्रपूरात आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येईल.काॅग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनीथल्ला,प्रदेशाध्यख नाना पटोले,बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार,खासदार प्रतीभा धानोरकर,खासदार नामदेव किरसान,आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती असणार आहे.या बैठकीतून आता आढावा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी वडेटटीवार,धानोरकर यांच्यातील वादाला विराम लावण्याच्या दृष्टीने बघितल्या जात आहे.चंद्रपूरात होत असलेल्या आजच्या बैठकीकडे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे विशेष लक्ष आहे.

इच्छुकांच्या बॅनरबाजीतही गटाचेच दर्शन

  चंद्रपुरात आज 23 रोजी होत असलेल्या काॅग्रेसच्या बैठकीत राज्याचे बडे नेते येणार आहेत.चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा याठिकाणी घेतल्या जाईल.काॅग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची भाउगर्दी आहे.यासाठी त्यांची फिल्डींग सुरू आहे.नेत्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले व सोशल मीडियातून प्रसारित करण्यात आलेल्या बॅनरमधूनही गटबाजीचेच दर्शन होत आहे.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!