Sunday, June 28, 2026
spot_img

चेनीथल्ला असं काय बोलले कि, टाळ्यांचा कळकळाट झाला……..!

 

चंद्रपूर

काॅग्रेस हा मजबूत पक्ष आहे.या पक्षाला बलीदानाची मोठी परंपरा आहे.काॅग्रेसला हरविण्याची ताकद कुणातच नाही.पण आपसी मतभेदामुळे पराभव होतात.काॅग्रेसला केवळ काँगेसच हरवू शकते असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार व खासदार प्रतीभा धानोरकर यांच्यातील वाद आपण मिटविला असल्याची स्पष्टोक्ती दिली.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून मी दोघांनाही बसवल.त्यांना समजलही.आता ते दोघेही पूर्ण ताकदीने कुठलेही मतभेद न ठेवता काम करतील अनं चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण जागा जिंकून दाखवतील असा विश्वास काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी व्यक्त केला.त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित पदाधिका-यांनी टाळयांचा कळकळाट केला.

लोकसभा निवडणुकीपासून विजय वडेटटीवार अनं प्रतीभा धानोरकर यांच्यातील वाद विकोपाला गेले होते.काॅग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यात या वादामूळे प्रचंड अस्वस्थता होती.ब्रम्हपूरीत झालेल्या एका कार्यक्रमात खासदार प्रतीभा धानोरकरांच्या एका विधानानंतर तर काॅग्रेसमध्येच खळबळ माजली.यानंतर त्यांचा हा वाद दिल्ली दरबारी पोहचला होता.दरम्यान काल चंद्रपूरात काॅग्रेसची पूर्व विदर्भातील पदाधिका-यांची आढावा बैठक घेण्यात आलीे.राज्याचे प्रभारी रमेश चेनीथल्ला,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार,खासदार प्रतीभा धानोरकर,जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे,गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.

काॅग्रेसची हि आढावा बैठक असली तरी सर्वाचे लक्ष विजय वडेटटीवार अनं प्रतीभा धानोरकर यांच्याकडे च होते.यादरम्यान काहीसा गोंधळ देखिल झाला.अनेक इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना चांगलेच सुनावले.उमेदवारी कुणाला दयायची ते आम्ही ठरवू.पक्षाने प्रत्येक मतदारसंघात सर्वे केले आहेत.त्यात मेरीटमध्ये येणा-यालाच उमेदवारी दिली जाईल अशी तंबी यावेळी देण्यात आली.
चंद्रपूर जिल्हयाने अल्पसंख्य समाजाला भरपूर प्रेम दिले आहे.मात्र ब्रम्हपूरी येथे आमच्या लहान बहिणीने चुकीचे वक्तव्य केले.आता त्या अशा चूक करणार नाही.कारण आम्ही एकत्र आलो असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!