Monday, October 12, 2026

पोंभुर्ण्यात 40 हजार कोटी रूपयाच्या गुंतवणूकीतून रोजगाराचे मोठे जाळे उभारणार मुनगंटीवारांचे आश्वासन.. आदिवासी बांधवांनी केलेल्या स्वागताने राज्यपाल भारावले

 

चंद्रपूर

विकास अनं विकास हाच आपल्या वाटचालीचा केंद्रबिंदू राहिला आहे.एकदा शब्द दिला कि तो पूर्ण करायचाच नाहीतर शब्द दयायचाच नाही.यासाठी आपण वचनबध्द आहोत.आदिवासी बांधवांचा सर्वागिंण विकास करण्यासाठी आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.गावांचा पेसामध्ये समावेश करण्यासाठी आपण पुढाकार घेतला.आता पोंभुर्ण्या तालुक्यातील जो मागेल त्याला झटका मशीन देण्यात येईल.पोंभुर्ण्यासाठी आपण काय काय केले.याचा पाढा वाचंताना त्यांनी आपले अगले व्हिजन सांगितले.पोंभुर्ण्यात येत्या दिवसात तब्बल चाळीस हजार करोड रूपयांची गुंतवणूक होणार आहे.यामाध्यमातून रोजगाराच्या अनेक मोठया संधी उपलब्ध होतील.केवळ पोंभुर्णाच नव्हे तर जिल्हयातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे काम पोंभूर्णा करेल अशी खूली ग्वाही राज्याचे वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी दिली.

पोंभुर्णा येथे आज आदिवासी बांधवांचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.राज्याचे राज्यपाल पि.सी.राधाकृष्णन यांचे पोंभुर्ण्यात आगमन झाले तेव्हा त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.परंपरागत आदिवासी पध्दतीने झालेल्या या स्वागताने राज्यपाल भारावले.मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध स्टाल लावण्यात आले होते.याठिकाणी भेट देउन राज्यपाल महोदयांनी बारकाईने त्यांच्या कलाकृतीची पहाणी केली.सोबत कौतूकही केले.

जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जान्सन यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.पोंभुर्णा येथे पार पडलेल्या आदिवासी मेळाव्यासाठी जिल्हाभरातून आदिवासी बांधव आले होते.पोंभुर्ण्यात राज्यपाल आल्यामूळे संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या मेळाव्यात अनेक लाभाथ्र्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला.

 राज्यपाल काय म्हणाले…
देशात आदिवासी बांधवाच्या विकासाचे मोेठे काम सूरू आहे.महामहिम राज्यपाल या आदिवासी समुदायाच्याच आहेत.पंतप्रधान मोदी यांचा सबका साथ सबका विकास हा नारा महत्वाचा आहे.विकासात्मक दृष्टीने त्याचीच वाटचाल सुरू झाली आहे.राज्यातील बारा जिल्हयात आपण भेटी दिल्या आहेत.आता राज्याच्या आदिवासी भागात जाउन तेथील स्थितीचे अवलोकन करू असे यावेळी राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विकासात्मक दृष्टी मोठी आहे.त्यांची आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत राज्यपाल महोदयांनी मुनगंटीवार यांचे कौतूक केले.याचसोबत जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगला कार्यक्रम घेतल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठीच गर्दी केली होती.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!