Sunday, October 11, 2026

गडचिरोलीत परिवर्तन होणारच….!‘‘या’’ नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

 

गडचिरोली

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली मतदारसंघात काॅग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती.बहूमताने विजय मिळवित महायुतीला जोर का धक्का दिला होता.या विजयाने काॅग्रेसमध्ये कमालीचा उत्साह आहे.आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीत जिल्हयातील तिनही विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी काॅग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली आहे.गेल्या दहा वर्षात गडचिरोली जिल्हयाच्या विकासाची पूरती वाट लागली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.पण त्यांच्या कार्यकाळात जिल्हयात मोठमोठया समस्या आवासून उभ्या आहेत.ते गडचिरोलीला केवळ इव्हेन्ट करण्यासाठी येत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे.

गडचिरोलीत आरोग्याचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे.रोजगाराअभावी बेरोजगारांचे हाल होत आहेत.विजेअभावी बळीराजा हतबल होत आहे.महिलंाचे मोठे प्रश्न आहेत.मार्गाची तर पूरती वाट लागली आहे.गडचिरोलीच्या विकासासाठी आम्ही काय काय केल याच गणीत सत्ताधारी मांडत आहेत.पण वास्तविकता मात्र वेगळी आहे.याचीच जाण सामान्य नागरिकांना व्हावी यासाठी काॅग्रेसच्या वतीने परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले.चपराळा येथून सुरू झालेली या पदयात्रा गेल्या एकोणवीस दिवसांपासून गडचिरोलीच्या गावागावात जात परिवर्तनाचा नारा देत आहे.गडचिरोली जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या यात्रेच्या माध्यमातून काॅग्रेस अनेक गोष्टी साध्य करायला निघाली आहे.त्यांच्या कार्यकत्र्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येत आहे.यामाध्यमातून सामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.सोबत नागरिकांना परिवर्तन हवे हा संदेशही देण्यात येत आहे.या यात्रेच्या निमीत्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांची संघटन बांधणी देखिल मजबूत होत आहे.
गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांची उपेक्षा करण्याच काम महायुती सरकारने केले आहे.त्याचे पाडेच आता या यात्रेच्या माध्यमातून गावागावात मांडले जात आहेत.राहुल गांधी यांनी देशात दोन मोठया पदयात्रा काढल्या.त्याचा सकारात्मक परिणाम देशभर दिसून आला.आता याच धर्तीवर गडचिरोली जिल्हयात महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गावागावात हि पदयात्रा जात आहे.परिवर्तनाचा नारा देत विजय आपलाच होईल हे ही या यात्रेतून सांगितल्या जात आहे.

गेल्या 19 दिवसांपासून गडचिरोलीच्या गावागावात परिवर्तन यात्रा आम्ही काढीत आहोत.याला येथील नागरिक मोठा प्रतिसाद देत आहेत.यंदा परिवर्तन अटळ आहे.असे नागरिक आम्हाला सांगत आहेत.गेली दहा वर्ष गडचिरोलीला खडडयात टाकणा-यांना आम्ही यावेळी असा धडा शिकविणार कि पून्हा ते काही सांगण्याची हिंमत करणार नाही असे बोल सामान्यातून बाहेर येत आहेत.हि यात्रा कमालीची यशश्वी ठरली असून याचा सकारात्मक परिणाम येणा-या दिवसात सर्वांना बघायला मिळणार आहे.
महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हाध्यक्ष काॅग्रेस,गडचिरोली

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!