Sunday, June 28, 2026
spot_img

अम्ब्रीशराव संतापले, म्हणाले कितीही पैसा लावा,यंत्रणाही भिडवा…तुमची आता काही खैर नाहीच…!

 

गडचिरोली

विधानसभा निवडणुकांची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होउ शकते.अशास्थितीत आता अघोषित रणयुध्द पेटल्याची परिस्थीती निर्माण झाली आहे.गडचिरोलीतील अहेरीत तर एकमेकांवर तुटून पडण्याचे राजकीय चित्र आहे.अहेरी येथे दसरा मेळाव्यानिमीत्ताने राजे अम्ब्रीशराव यांनी केलेल्या भाषणातून विरोधकांवर कडा प्रहार केला.मंत्री धर्मराव आत्राम यांच्यावर त्यांनी अक्षरश टिकेचे बाण सोडले.तुम्ही कितीही पैसा लावा,यंत्रणाही वाफरा.पण जनता तुम्हाला त्याच खडडयात टाकल्याशिवाय राहणार नाही.पण मी देखील तुम्हाला सोडणार नाही.असा इशारा देत अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुढील दिशा स्पष्ट केली.

अहेरी विधानसभा मतदारसंघात यंदा वेगळीच राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.महायुमतीकडून धर्मराव आत्राम यांना उमेदवारी पक्की मानली जात आहे.दुसरीकडे आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांनी शरद पवाराच्या राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश घेत कुठल्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचा संकल्प सोडला आहे.अम्ब्रीशराव आत्राम हे भाजपचे नेते आहेत.पण महायुतीकडून राष्ट्रवादी अजीत पवार गटाला या मतदारसंघाची उमेदवारी मिळणार हे निश्चीत आहे.असे असले तरी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.तिसरीकडे काॅग्रेसचे हनूमंतू मडावी हे देखिल पूर्ण तयारीनिशी मैदानात आहेत.काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांचा भक्कम पाठिंबा त्यांच्या पाठिशी आहे.

महायुतीकडुन उमेदवारी मिळण्याची शक्यता नसतांनाही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे.दसरा मेळाव्यातून बोलतांना त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले.आपल्या भागात असलेल्या एका कंपनीकडून एका विशीष्ट नेत्यासाठी फिल्डींग लावली जात आहे.कंपनीला केवळ आपल्या इशा-यावर नाचणारा माणूस हवा आहे.अशा कपंनीला आपण योग्य वेळी धडा शिकवू असे देखिल ते म्हणाले.

अहेरी जिल्हयाची अनेकदा घोषणा झाली.पण प्रत्येक वेळी हा प्रश्न पुन्हा लांबणीवर चाललाय.अशात आता अहेरी जिल्हा केल्याशिवाय दम घेणार नसल्याचे अम्ब्रीश आत्राम यांनी सांगितले.दसरा मेळाव्यानिमीत्ताने पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठया प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!