
चंद्रपूर
राजुरा विधानसभा निवडणुकीत आता रंग भरला आहे.आज या मतदारसंघात उभे असलेले उमेदवार भूषण फुसे यांनी आज वेगळया स्टाईलने प्रचारयंत्रणा राबविली.एक मोठा ट्रक अन त्यात उभे राहत डान्स करित त्यांनी लोकांना हात फिरविला.आज याठिकाणी फुसंेच्या या कारनाम्याची मस्तच चर्चा रंगली.
राजुरा मतदारसंघात यंदा कमालीची रंगतदार अवस्था आहे.अनेक उमेदवार याठिकाणी उभे आहेत.आपलाच विजय व्हावा यासाठी अनेक उमेदवार रक्ताचे पाणी करित आहेत.
काॅग्रेसचे सुभाष धोटे,संघटनेचे वामनराव चटप,भाजपचे देवराव भोंगळे,गोंडवाना,वंचित चे गजानन जुमनाके,मनसेचे सचिन भोयर यासह अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भूषण फुसे हे देखिल या निवडणूकीत आपले नशीब आजमावीत आहेत.आज त्यांनी गांेडपिपरीत मस्तच माहोल केला.एक मोठा ट्रक त्यात आजुबाजुला बाउन्सर अनं उभे राहत डान्स करित त्यांनी नागरिकांना मतांसाठी आवाहन केले.याची जोरदार चर्चा संपूर्ण नगरात होती.



