
चंद्रपूर:-
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला.अंन मग काय जो तो कामाला लागला.अनेकांनी अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली आहे.काही नेते ऐनवेळी एन्ट्री मारण्याच्या तयारीत आहेत.आमदार होण्याचे स्वप्न अनेकांना झोप लागू देत नसल्याचे चित्र आहे.चंद्रपूरातील राजुरा विधानसभा मतदारसंघात यावेळी उमेदवारांची भाउगर्दी होणार असल्याची स्थिती आहे.राजुरा मतदारसंघ हा काॅग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.पण शेतकरी संघटनेची या मतदारसंघात बरीच ताकद आहे.मागील निवडणुकीत काॅग्रेस विरूध्द शेतकरी संघटना असाच सामना रंगला होता.या निवडणुकीत शेवटच्या फेरीपर्यत कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.पण शेवटी काॅग्रेसच्या सुभाष धोटे यांनी अडीच हजार मतांनी विजय मिळविला.आता पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती या मतदारसंघात होतेय कि काय अशी स्थिती आहे. वामनराव चटपांनी लोकसभा निवडणुक लढविली होती.त्यावेळी हि आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले होते.पण यानंतर त्यांनी गेली विधानसभा निवडणूकीत रंग भरला.आता पुन्हा आपली हि शेवटची निवडणूक असल्याचे चटप सांगत आहेत.त्यांचे कार्यकर्तेही गावागावात हेच सांगत आहेत.पण त्यांच्या या शेवटच्या निवडणुकीचा मुददा घेत विरोधक त्यांना चांगलेच ट्रोल करित आहेत.विविध स्वरूपाच कॅप्शन टाकीत चटपांचे त्या मुददयावरून चिमटे काढले जात आहेत.पण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मात्र विजय आमचाच होणार असल्याचे विश्वासाने सांगत आहेत.
राजुरा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूरातील महत्वाचा मतदारसंघ आहे.काॅग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून वामनराव चटप यांनी तब्बल तिनदा विजय मिळवित शेतकरी संघटनेचा हक्काचा मतदारसंघ बनविला.2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघाने चमत्कार घडविला.संघटनेतून भाजपत गेलेेले संजय धोटे यांनी बाजी मारली.त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपचा कमळ फुलला.त्यावेळी संघटनेनी प्रभाकर दिवे यांनी उमेदवारी दिली होती.संघटनेची मोठी ताकद असतांना दिवेंना मिळालेली अल्प मते अनेकंाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली होती.याबाबत तत्कालीन वेळी संघटनेच्या नेत्यांवर अनेक आरोप देखिल करण्यात आले होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात शेतकरी संघटनेकडून वामनराव चटप तर काॅग्रेसकडून सुभाष धोटे रिंगणात होते.भाजपने संजय धोटे यांना उमेदवारी दिली तर गोंडवाना गणतंत्र व वंचित बहूजन आघाडी युतीचे गोदरू पाटील जुनमाके रिंगणात होते.चौरंगी झालेल्या या लढतीत काॅग्रेसच्या सुभाष धोटे यांनी बाजी मारली.त्यांनी वामनराव चटप यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला होता.शेवटच्या फेरीपर्यत चाललेल्या या लढाईत अतिशय रोमांचकारी स्थिती निर्माण झाली होती.
आता पुन्हा एकदा वामनराव चटप मैदानात आहेत.हि शेवटची निवडणूक असल्याची रि ते पुन्हा ओढत आहेत.गावागावातील जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेत आहेत.अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी आपणाकडे वळते केले आहे.दुसरीकडे आपला नेता विजयी झाला अनं महाविकास आघाडीचे सरकार आले तर सुभाष धोटे हे मंत्री असतील असे सांगत काॅग्रेस कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत.
धोटेंचे ‘‘जयभीम’’…..!
आमदार सुभाष धोटे पुन्हा एकदा विधानसभेच्यारिंगणात आहेत.यावेळी त्यांनी अतिशय सावध पावित्रा घेतला आहे.सध्या जयभीम कॅप्शन देत त्यांचे कार्यकर्ते सुभाष धोटे यांचा एक व्हिडीओ शेअर करित आहेत.दलीत समाजाला जोडण्याची हि पाॅलीसी असल्याचे बोलल्या जात आहे.कुणबीबहूल असलेल्या या मतदारसंघात दलीत समाजाची मते निर्णायक आहेत.सोबत आदिवासी बांधवांची साथ सर्वानंाच हवी आहे.अशा वेळी या समाजाला आपलेसे करण्यासाठी नेते विविध फंडे वाफरित आहेत.
भाजपचे काय………!
काॅग्रेस,शेतकरी संघटनेचे उमेदवार पक्के असतांना भाजप राजुरा विधानसभा मतदारसंघात कुणाला संधी देईल याबाबतचा सस्पेन्स अदयापही कायम आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक नेते तयारी करून बसले आहेत.माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,जि.प.चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे व भाजप नेते खुशाल बोंडे यांच्यापैकी पक्ष कुणाला पसंती देईल हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
चंदेल यांना मिळणार का वंचितचा आधार
राजुरा विधानसभा मतदारसंघात आजपर्यत राजु-यांच्याच नेत्यांची मक्तेदारी राहिली आहे.गोंडपिपरी जिवतीसारखे मागास तालुक्याला अदयापही नेतृत्वाची संधी मिळाली नाही.अशा वेळी गोंडपिपरीचे नगरसेवक,बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते महंेद्रसिहं चंदेल हे निवडणूक लढविण्याच्या फूल तयारीत आहेत.यासाठी ते वंचित बहूजन आघाडीची तिकीट मिळविण्याच्या कामात लागले आहेत.चंदेल यांचा एच पी गॅस एजन्सीचा व्यवसाय आहे.वंचित चे निवडणूक चिन्ह हे सिलेंडर आहे.याचा बराच लाभ होउ शकतो असा विश्वास चंदेल यांना आहे. चंदेल गेल्या अनेक दिवसांपासून कामाला लागले आहेत


